मुंबई : आजच्या काळात ऑनलाइन शॉपिंगला लोकांकडून खूप पसंती मिळत आहे. त्यात कोरोना काळात लोकांना बरीचशी शॉपिंग ऑनलाईनच केली आहे. यामुळे गर्दीत न जाता किंवा लोकांच्या संपर्कात न येता, तुम्ही हवी ती वस्तु घरी आणू शकता. तुम्हाला देखील घरी बसून ऑनलाइन शॉपिंग करण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका चुकीबद्दल सांगणार आहोत जी करणं तुम्ही टाळलं पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या चुकीमुळे तुम्हाला लाखोंचे नुकसान होऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊया.


Online Shopping करताना ही चूक करू नका


बरेच लोक ऑनलाइन शॉपिंग करताना त्याचा रिव्ह्यू वाचतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर अनेक फेक रिव्‍युज् दिसतात, ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.


Online Shopping स्कॅम कसे टाळाल?


आजकाल एक ऑनलाइन शॉपिंग घोटाळा सुरू आहे, ज्यामध्ये सर्व शॉपिंग वेबसाइटवर अनेक उत्पादनांचे चुकीचे रिव्यू देतात. या वेबसाइट्समध्ये Amazon आणि Flipkart सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मचाही समावेश असल्याचं देखील समोर आलं आहे.


अशा प्रकारे तुम्ही सुरक्षित राहू शकता


या घोटाळ्यापासून तुम्ही सुरक्षित कसे राहाल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, थोडे सावध राहून तुम्ही या घोटाळ्यात अडकण्यापासून स्वत:ला वाचवू शकता.


आम्ही तुम्हाला अशाच काही टूल्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही शॉपिंग साइटवरील कोणते रिव्ह्यू खोटे आहेत आणि कोणते खरे आहेत हे ओळखू शकाल.


अशा प्रकारे बनावट आणि वास्तविक पुनरावलोकनामध्ये फरक करा


आम्ही ReviewMeta, Fakespot आणि The Review Index सारख्या Chrome एक्स्टेंशनबद्दल बोलत आहोत, जे तुम्हाला बनावट वस्तु किंवा रिव्यू ओळखण्यात मदत करतील.


यासाठी, प्रथम तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर Chrome उघडा आणि वरील कोणतेही एक्टेंशन डाउनलोड करा.


सुरुवातीला तुम्हाला जे उत्पादन घ्यायचं आहे, त्या पृष्ठावर जा आणि उत्पादनाची URL कॉपी करा. आता त्या क्रोम एक्स्टेंशनवर जा आणि लिंक पेस्ट करा. येथे तुम्ही रिव्हूज चेक करा, येथे तुम्हाला मूळ रिव्हूज दिसतील.


अशा प्रकारे, तुम्ही खोट्या किंवा बनावट रिव्हूजना बळी पडणार नाही आणि महाग उत्पादने खोटे रिव्हूज वाचून खरेदी करणार नाही. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील.