OpenAI Makers Of ChatGPT Court Case: सर्वात आधुनिक आणि भविष्यातील तंत्रज्ञान अशा विशेषणांसहीत मागील काही महिन्यांपासून जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेलं ChatGPT अडचणीत येण्याची शक्यता आहे. ChatGPT ची निर्मिती करणारी ओपन एआय कंपनी अडचणी दिवसोंदिवस वाढत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमध्ये कंपनीकडे ChatGPT सुरु ठेवण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याचं सांगण्यात आलं. तसेच कंपनीविरोधात डेटा प्रायव्हसीसंदर्भातील प्रश्नही उपस्थित करण्यात आले. आता अमेरिकेतील लेखकांच्या एका गटाने कंपनीविरोधात कॉपीराइटचं उल्लंघन केल्याप्रकरणी खटला दाखल केला आहे. मायक्रोसॉफ्टचं पाठबळ असलेल्या एएआय चॅटबोट ChatGPT ला प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या लिखाणाचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आल्याचा आरोप लेखकांनी केला आहे.


नेमका आक्षेप काय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलित्झर पुरस्कार विजेते मायकल चॅबन यांच्यासहीत अमेरिकेतील एका मोठ्या गटाने सॅन फ्रान्सिस्कोमधील न्यायालयामध्ये ओपन एआयविरोधात खटला दाखल केला आहे. लेखांच्या गटाने केलेल्या दाव्यानुसार, क्षणात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणारे चॅटबोट हे त्यांची माहिती मिळवण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहेत. यासाठी जे साहित्य वापरण्यात आलं आहे ते आपण लिहिलेलं साहित्य असून त्याचा दुरुपयोग केला गेला आहे. नाटककार डेव्हिड हेन्री हृांग आणि लेखक मॅथ्यू क्लेम, राचेल लुईस स्नाइडर आणि एलेट वाइल्डमन यांनी दाखल केलेल्या खटल्यामध्ये ओपन एआय मानवाने विचारलेल्या प्रश्नांची लिखित स्वरुपामध्ये उत्तरं देण्यासाठी ChatGPT ला जे प्रशिक्षण दिलं गेलं त्यासाठी लेखकांची परवानगी न घेता त्यांचं साहित्य वापरण्यात आल्याचा दावा केला आहे.


यापूर्वी अशाच प्रकरणावर काय म्हटलेलं ओपन एआयने


ओपन एआयविरोधात दाखल करण्यात आलेली कॉपीराइटसंदर्भातील ही तिसरी याचिका आहे. मायक्रोसॉफ्ट, मेटा प्लॅटफॉर्म आणि स्टेबिलिटी एआयसहीत अन्य एआय कंपन्यांवरही एआय प्रशिक्षणासाठी त्यांचं काम चुकीच्या पद्धतीने, परवानगी न घेता कॉपीराइटचं उल्लंघन करुन वापरण्यात आल्याचा आरोप केला आहे. यावर ओपन एआय आणि अन्य एआय कंपन्यांनी दिलेल्या उत्तरामध्ये एआय चॅटबोट्सला प्रशिक्षण देण्यासाठी इंटरनेटवर कॉपीराइट स्कॅप्ड कंटेट वापरला जातो असा दावा केला आहे. सध्या लेखकांनी दाखल केलेल्या खटल्याविरोधात ओपन एआयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


लोकप्रियतेला फटका


ChatGPT च्या लोकप्रियतेमध्येही कमालीची घसरण झाली आहे. मागील 6 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच ChatGPT च्या युझर्सची संख्या घसरली आहे. अनेक देशांमध्ये आणि शैक्षणिक विद्यापिठांमध्ये डेटासंदर्भातील सुरक्षेच्या मुद्द्यावरुन ChatGPT वर बंदी घालण्यात आली आहे. 


अनेक ठिकाणी बंदी


स्मार्टफोन बनवणाऱ्या सॅमसंग, अॅपल यासारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ChatGPT सारखी एआय टूल्स वापरु नयेत असं सांगितलं आहे. मात्र हे निर्देश का देण्यात आलेत याची कारणं कंपन्यांनी दिलेली नाहीत.