नवी दिल्ली : Oppo या लोकप्रिय मोबाईल कंपनीने त्यांच्या A सीरीजमधील आणखी एक नवा स्मार्टफोन Oppo A71 लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९ रूपये इतकी ठेवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने हा स्मार्टफोन सध्या पाकिस्तान आणि मलेशियामध्ये लॉन्च केलाय. मात्र भारतात हा फोन कधी उपलब्ध होईल, याची माहिती समोर आलेली नाही. हा फोन ब्लॅक आणि गोल्ड कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.  


ड्युअल सिम असलेल्या Oppo A71 हा फोन OS 3.1 च्या अ‍ॅन्ड्रॉईड 7.1 नूगटवर चालतो आणि यात ५.२ इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये ३जीबी रॅमसोबत 1.5GHz ऑक्टा-कोर MediaTek MT6750 प्रोसेसर देण्यात आलं आहे. याचं इंटरनल स्टोरेज १६ जीबीचं आहे. जे मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने २५६जीबी इतकं वाढवता येऊ शकतं. 


कॅमेराबाबत सांगायचं तर याच्या रिअर कॅमेरामध्ये LED फ्लॅश, PDAF आणि f/2.2 अ‍ॅपार्चर असलेला १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी यात f/2.4 अ‍ॅपार्चर असलेला ५ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलाय. कनेक्टिव्हिटी ऑप्शनसाठी Oppo A71 मध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth v4.0, 3.5mm ऑडिओ जॅक आणि Micro-USB देण्यात आला आहे.