मुंबई : 'ओप्पो'ने अधिकृतरित्या Oppo F11 Pro स्मार्टफोन भारतात ५ मार्चला लॉन्च करणार असल्याची घोषणा केली. या फोनला पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 'सुपर नाईट मोड' टेक्नोलॉजीचा वापर करण्या आल्यामुळे अंधारात फोटोग्राफीही करण्यात येणार आहे. यामुळे कमी प्रकाशातही उत्तम फोटोग्राफी केली जाऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



काय आहेत 'Oppo F11 Pro'ची वैशिष्ट्ये -


- ४८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल एलईडी फ्लॅश डुअल कॅमेरा
- सेल्फी 'पॉप अप' कॅमेरा
- VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सिस्टम
- फिंगरप्रिंट सेंसर
- ६ जीबी रॅम
- ऑक्टा कोर प्रोसेसर
- ४५०० mAh बॅटरी बॅकअप
- ६.५ इंची डिस्प्ले


५ मार्चला मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. या फोनची किंमत काय असेल याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. परंतु 'Oppo F11 Pro'ची किंमत जवळपास ३५ हजार ९९० इतकी असण्याची शक्यता आहे. मिडनाईट ब्लॅक, डार्क ब्लू आणि सिल्व्हर रंगात 'Oppo F11 Pro'उपलब्ध होऊ शकतो.