सेल्फी चाहत्यांसाठी ओपोचा F5 स्मार्टफोन लॉन्च
ओपो या लोकप्रिय मोबाईल कंपनीने भारतात आपला ‘सेल्फी एक्सपर्ट’ ओपो F5 स्मार्टफोन लॉन्च केलाय. ओपोने या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरासोबतच आर्टिफिशल इंटेलिजंसचं फिचरही दिलं आहे.
मुंबई : ओपो या लोकप्रिय मोबाईल कंपनीने भारतात आपला ‘सेल्फी एक्सपर्ट’ ओपो F5 स्मार्टफोन लॉन्च केलाय. ओपोने या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरासोबतच आर्टिफिशल इंटेलिजंसचं फिचरही दिलं आहे.
म्हणजे तुम्हाला सेल्फी काढण्यासाठी बटन क्लिक करण्याची काहीच गरज पडणार नाही. फोन आर्टिफिशल इंटेलिजंसने आपोआप ऑब्जेक्टला ओळखेल आणि फोटो क्लिक करेल.
मुंबईत गुरूवारी हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलाय. हा फोन F3 ला रिप्लेस करणार आहे. हा फोन याआधीच फिलीपीन्समध्ये लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये iPhone सारखंच फेस अनलॉक फिचर देण्यात आलंय. फिंगरप्रिंट सेंसर आणखीन चांगलं करण्यात आलं आअहे.
ओपो F5 मध्ये फुल एचडी ६ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. मीडियाटेक ऑक्टाकोर प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये २ रॅम व्हेरिएंट आहेत. यात ४जीबी आणि ६ जीबी असे पर्याय आहेत. सेल्फी कॅमेरा एफ २.० अपार्चरसोबत २० मेगापिक्सल आहे. बॅक कॅमेरा एफ १.८ अपर्चर असलेला १६ मेगापिक्सल सेंसर आहे.
या स्मार्टफोनच्या ४ जीबी मॉडेलची किंमत १९ हजार ९९० रूपये इतकी तर ६ जीबी मॉडेलची किंमत २४ हजार ९९० रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. ६ जीबी मॉडेलची विक्री डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तर ४ जीबी फोन नोव्हेंबरमध्ये मिळेल.