Oppo find X फोनचे लॉन्चिंगपूर्वी फिचर्स लीक
..
मुंबई : Oppo कंपनीच्या Find X हा स्मार्टफोन अधिकृतरित्या १९ जून रोजी लॉन्च होणार आहे. पॅरिसमधील लूर्व म्युझियममध्ये आयोजित कार्यक्रमात Oppo Find X हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. या संदर्भात टीझरही समोर येत आहेत. मात्र, हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याचे फिचर्स लीक झाले आहेत.
Oppo Find X हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये येणार आहे. हा फोन PAFM00 आणि PAFT00 नावाने लॉन्च होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. या दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे असणार आहेत.
Oppo Find X या फोनमध्ये ऑप्टिकल झूम आणि फेशियल रिकग्निशनचा पर्याय देण्यात येणार आहे. फोनमध्ये 8.0 ओरियोवर चालणाऱ्या या फोनमध्ये कलर ओएस देण्यात येणार आहे. फोनला ड्युअल सिम सपोर्ट करेल. 6.3 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले, 2.5 डी कर्व्ड ग्लासची सुरक्षेसाठी असणार आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 ऑक्टा-कोअर प्रोसेसरवर काम करणारा या फोनचा सर्वाधिक क्लॉक स्पीड 2.8 गीगाहर्ट्ज आहे. फोनमध्ये 8GB रॅम, इंटरनल स्टोरेजसाठी 128GB जागा देण्यात आली आहे.
Oppo कंपनीने नुकताच आपला रियलमी 1 भारतात लॉन्च केला आहे. रियलमी 1 ओप्पो हा एक बजेट फोन आहे. ज्याची किंमत 8,990 रुपयांपासून सुरु होते. यामध्ये मीडियाटेक हीलियो पी60 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6GB रॅम, इनबिल्ट स्टोरेज 128GB आणि रियर कॅमेरा 13 MP देण्यात आला आहे.