भारतात Oppo Reno 3 Pro स्मार्टफोन लॉन्च
जगातील पहिला ४४ मेगापिक्सल ड्युल पंच होल कॅमेरा
नवी दिल्ली : Oppo Reno 3 Pro भारतात लॉन्च झाला आहे. हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, जो ४४ मेगापिक्सल ड्युल पंच होल सेल्फी कॅमेरासह लॉन्च झाला आहे. ओप्पो रेनो ३ प्रो भारतात २९,९९० रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लॉन्च झालाय. Oppo Reno 3 Pro स्मार्टफोन ६ मार्च २०२० पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आजपासून याची प्री बुकिंग सुरु आहे.
Oppo Reno 3 Pro स्मार्टफोन भारतात दोन प्रकारांत लॉन्च केलाय. ८ जीबी + १२८ जीबी वेरिएंट २९,९९० रुपये आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट ३२,९९० रुपयांत लॉन्च झाला आहे. हा फोन Auroral Blue, Midnight Black आणि White या तीन रंगात बाजारात आणलाय.
Oppo Reno 3 Pro लॉन्च ऑफर -
या स्मार्टफोनच्या लॉन्च ऑफरमध्ये, HDFC Bank, ICICI बँक, RBL बँक आणि येस बँकच्या कार्डमधून पेमेंट केल्यास ग्राहकांना १० टक्क्यांचा डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय कंपनी Reno 3 Pro सह वायरलेस स्पीकर आणि Oppo Enco Free वायरलेस हेडफोनवर २००० रुपयांचा डिस्काऊंट ऑफर करतेय.
काय आहेत फिचर्स -
क्वार्ड रियर कॅमेरा सेटअप - ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आलाय. रियर कॅमेरा सेटअपमध्ये १३ मेगापिक्सल टोलिफोटो शूटर कॅमेरा सेन्सर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड ऍन्गल सेन्सर देण्यात आला आहे. २ मेगापिक्सल मोनो सेन्सर आहे. ४४ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, शिवाय २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सरही देण्यात आला आहे.
४,०२५mAh बॅटरी, 30W फास्ट VOOC Flash Charge 4.0 टेक्नोलॉजी सपोर्ट
हिडन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट Unlock 3.0 सेन्सर
Dolby Atmos Hi-Res Audio सपोर्ट
octa-core प्रोसेसर