YouTube द्वारे कमाई करण्याची नामी संधी, जाणून घ्या नव्या फीचर्सबाबत
YouTube Courses: यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. काही व्हिडीओ बनवून चॅनेलवर अपलोड करून पैसे कमवतात. असे अनेक यूट्यूब चॅनेल उपलब्ध आहेत. आता यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याची आणखी संधी मिळणार आहे. आतापर्यंत यूट्यूबवर मॉनेटायझेशनसाठी आठ पर्याय आहेत. नव्या पर्यायाद्वारे कंटेंट क्रिएटर्सला फायदा होणार आहे.
YouTube Courses: यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. काही व्हिडीओ बनवून चॅनेलवर अपलोड करून पैसे कमवतात. असे अनेक यूट्यूब चॅनेल उपलब्ध आहेत. आता यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याची आणखी संधी मिळणार आहे. आतापर्यंत यूट्यूबवर मॉनेटायझेशनसाठी आठ पर्याय आहेत. नव्या पर्यायाद्वारे कंटेंट क्रिएटर्सला फायदा होणार आहे. कंपनीने या फिचरबाबत 19 डिसेंबरला गुगल फॉर इंडिया इव्हेंट या कार्यक्रमात सांगितलं आहे. गुगलने कोर्सेस फीचरची घोषणा केली आहे. लवकरच हे फीचर भारतात लाँच होणार आहे. कोर्सेस सबस्क्रिप्शन आधारित मॉडेल पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लाँच केले जाऊ शकते. यूट्यूब चार क्षेत्रांमध्ये नवीन फीचर कोर्स लाँच करणार आहे. डिजिटल कौशल्ये, उद्योजकता, व्यवसाय आणि वैयक्तिक आवड असे पर्याय असतील. हे फीचर सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे.
यूट्यूब इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक इशान जॉन चॅटर्जी यांनी सांगितले की, YouTube Courses फक्त भारत, दक्षिण कोरिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये सुरू केले जातील. या कोर्सेसद्वारे, युजर्स सोप्या पद्धतीने स्वत:चे कौशल्य वाढवू शकतील. आता हे कंटेंट प्रोड्युसरवर अवलंबून आहे की, या माध्यातून मॉनेटाइज करायचं आहे की नाही. त्यांना यातून फायनान्शियल रिवार्ड मिळवायचे असतील, त्यांनाही लवकरच पर्याय मिळेल.
बातमी वाचा- Car Loan: कार लोन घेताना 20-10-4 चं सूत्र लक्षात ठेवा! कर्ज लवकर फिटेल
YouTube प्रोड्युसर या प्लॅटफॉर्मवर पीएनजी आणि पीडीएफ फॉरमॅटमध्ये कंटेंट अपलोड करू शकतात. शिकवत असलेल्या अभ्यासक्रमाचे एक्सप्लेनेशन देखील युजर्संना देऊ शकतात. गुगल त्याच्या निवडक पार्टनर आणि लेखकांसह या फीचरची चाचणी घेत आहे. हे फीचर सबस्क्रिप्शन आधारित मॉडेल असेल. भारतात 6 कोटी व्हिडीओ असे आहेत जे शिक्षण आणि कौशल्य कंटेंटवरर लक्ष केंद्रित करतात. यूट्यूबच्या या पावलामुळे देशातील आघाडीच्या एडटेक कंपन्यांसमोर आव्हान निर्माण होणार आहे. यात BYJU'S, Unacademy आणि Physics Wallah यांच्याशी स्पर्धा असेल.