ऑर्कुटची नव्या रूपात भारतामध्ये दमदार एन्ट्री
काही वर्षांपूर्वी `ऑर्कुट`नं तरूणाईला वेड लावलं होतं.
मुंबई : काही वर्षांपूर्वी 'ऑर्कुट'नं तरूणाईला वेड लावलं होतं. मात्र फेसबूकने सोशल मीडीयाच्या विश्वात दमदार एन्ट्री घेतल्यानंतर ऑर्कुट बंद पडले. आता फेसबूकवर डाटा सुरक्षित नसल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. जगभरातील अनेक युजर्सनी फेसबूक अकाऊंट डिलिट केली. हीच वेध साधत आता ऑर्कुटने बाजारात पुन्हा एन्ट्री घेतली आहे.
नव्या स्वरूपात ऑर्कुट
ऑर्कुट पुन्हा बाजारात आलेले असलं तरीही त्याचं स्वरूप बदललेलं आहे. 'हॅलो' या नावाने नवीन अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. आर्कुटचे संस्थापक बुयुखोकटेन हे सध्या भारताच्या दौर्यावर आहेत. 'हॅलो अॅप' भारतामध्ये लॉन्च करण्यात आले आहे.
भारतात उत्तम प्रतिसाद
भारतामध्ये अवघ्या काही दिवसात तब्बल १० लाखांहून अधिक लोकांनी हॅलो हे अॅप डाऊनलोड केल्याचा दावा करण्यात आला आहे. 'हॅलो' अॅप हे प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. भारतामध्ये आर्कुटचे ३० कोटी युजर होते. मात्र फेसबूक आल्यानंतर तरूणांनी ऑर्कुटला अलविदा केला होता. भारतापूर्वी ब्राझीलमध्ये 'हॅलो' अॅप लॉन्च करण्यात आले होते.