`नेहरुजी` आणि `बाल दिवस` यांच्याशी संबंधित ९ महत्वाच्या बाबी
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला
मुंबई : १) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. नेहरूंना लहान मुलं खूप आवडायची. यावरून नेहरू यांचा जन्मदिवस 'बाल दिवस' म्हणून साजरा केला जातो.
२) नेहरुजींची प्रतिमा डोळ्यासमोर आणली की, लगेच त्यांचा 'नेहरु जॅकेट' आणि त्यात खोवलेलं गुलाबाचं फूल असं दृश्य समोर येतं. नेहरुजींना गुलाबाच्या फुलांची खूप आवड होती.
३) नेहरुजीं लहान मुलांना देशाचं सोनेरी भविष्य समजायचे.
४) तरुणाच्या विकासासाठी नेहरुजींनी इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) आणि आय.आय.एम (IIM) यांसारख्या संस्थेची स्थापना केली.
५) बाल दिवस हा शाळेत, कार्यालयात तसेच इतर संस्थेत मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो. त्यात लहान मुले सहभागी होतात. काही शाळेत त्या दिवशी मुलांना सहलीला देखील घेऊन जातात, तसेच लहान मुलांना प्रेरणादायक चित्रपटही दाखवला जातो.
६) भारताच्या पलिकडे अन्य देशातही 'बाल दिवस' वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. ज्या देशात 'बाल दिवस' सर्वात प्रथमच साजरा केला, तो देश 'भारत' नसून 'तुर्की' हा देश आहे.त्यांनी १९२० साली 'बाल दिवस' पहिल्यांदा साजरा केला.
७) १९२५ साली 'बाल दिवस'ची मागणी केली गेली होती. त्यानंतर १९५३ साली संपूर्ण जगात मान्यता मिळाली.
८) यू.एन (UN) २० नोव्हेंबर हा दिवस 'बाल दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. पण काही देशात वेगवेगळ्या तारखेला हा दिवस साजरा केला जातो. तर काही देशात आजही २० नोव्हेंबर हा दिवस 'बाल दिवस' म्हणून साजरा करतात.
९) 'बाल दिवस' हा मुलांच्या उज्ज्वल भविष्य आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाची आठवण करुन देतो.