नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या डिजिटल पेमेंट सिस्टम लॉन्च केल्यानंतर देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम (Paytm) व्हॉट्सअ‍ॅप विरोधात अपील दाखल करण्याच्या तयारीत आहे. 


काय म्हणाले पेटीएम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅपच्य डिजिटल पेमेंट सर्व्हिस विरोधात त्यांची कंपनी यूपीआयकडे अपील करणार आहे. ते म्हणाले की, इंस्टंट मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात येण्यासाठी अनेक अनुचित गोष्टींचा वापर केलाय. 


नियमांचं पालन नाही


विजय शेखर शर्मा यांनी व्हॉट्सअ‍ॅप नव्या फीचरला सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक सांगितले आहे. ते म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅपचं हे फीचर सुरू झाल्याने डिजिटल देवाण-घेवाणाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यांनी आरोप लावलाय की, व्हॉट्सअ‍ॅपने डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात उतरण्यासाठी नियमांचं पालन केलं नाहीये. पेटीएमचे सीईओ म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅपने पैसे पाठवण्यासाठी लॉग-इन आणि आधार कार्डची अनिवार्यता केली गेली नाहीये.


नियमांमध्ये फेरबदल


पेटीएमने या विरोधात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात येणार असं सांगितलं आहे. महत्वाची बाब म्हणजे यूपीआय सिस्टमला एनपीसीआयनेच तयार केलं आहे. पेटीएमचे सीईओ म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅप ने त्यांच्या गरजेनुसार नियमांमध्ये फेरबदल केले आहेत. ते म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅपने त्यांचं ट्रायल सुरू केलंय. लाखों यूजर्सना पेमेंट फीचरचं ट्रायल वापरण्याचं स्वातंत्र्य दिलंय. मुळात ट्रायल वापरण्याची अनुमती केवळ ५ ते ७ हजार लोकांनाच मिळत असतं. 


पेटीएमचं नुकसान


सध्या भारतात २० कोटी व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स आहेत. अशात व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर आल्यावर पेटीएमला मोठं नुकसान होऊ शकतं.