नवी दिल्ली : डिजिटल वॉलेट पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.


पेटीएमने सुरु केली नवी सेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी सेवा सुरु केली आहे. जर तुम्ही पेटीएम वापरता तर या सुविधेचा फायदा तुम्ही घर बसल्या करु शकणार आहात. तसेच या सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागणार नाहीत. 


पेटीएमने नुकतचं पेटीएम फास्टॅग सेवा सुरु केली आहे. पेटीएम फास्टॅग वाहन चालकांना टोल प्लाझावर न थांबता जाण्याची सुविधा देतं. आता कंपनीने दोन नव्या सुविधा सुरु केल्या आहेत. 


या आहेत दोन नव्या सेवा 


नव्या सेवांच्या अंतर्गत ग्राहक कुणालाही गोल्ड (सोनं) गिफ्ट देऊ शकतात. तर, दुसऱ्यात तुम्ही स्वत:साठी गोल्ड खरेदी करु शकता. या दोन्ही सेवा Paytm गोल्ड नावाने मिळणार आहेत. नंतर तुम्ही या गोल्डच्या बदल्यात कॅश घेऊ शकता किंवा गोल्डची फिडिकल डिलिव्हरीही घेऊ शकता.


२४ कॅरेट गोल्ड मिळणार


कंपनीने दावा केलाय की, तुमच्या जवळच्या नागरिकांना २४ कॅरेट ९९९.९ प्योरिटी असलेलं गोल्ड कितीही वेळा पाठवू शकता. पेटीएमच्या मते, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन ६० टक्के गोल्डची खरेदी टॉयर टू आणि टॉयर थ्री सिटीजवरुन होते. तसेच ५०० रुपयांचं गोल्ड खरेदी करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचंही पेटीएमने म्हटलयं.


गोल्ड सेव्हिंग प्लान 


Paytm च्या मते, त्यांच्या गोल्ड सेव्हिंग स्किमचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या सेव्हिंगनुसार खरेदीची संधी उपलब्ध करुन देणं आहे. या माध्यमातून ग्राहक अगदी सहजपणे आपल्या गरजेनुसार सोन्यात गुंतवणुक करु शकतात. 


कधीही मिळेल सोनं


Paytm च्या मते, ग्राहक हे सोनं कधीही मिळवू शकतात. त्यांचं हे सोनं MMTC PAMP's च्या लॉकरमध्ये पूर्णपणे सुरक्षित राहतं. या गोल्डचा विमा ही असतो ज्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. या सोन्याच्या खरेदीत कुठल्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही.