मुंबई : गेल्या काही वर्षापासून डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरीक रोखीने व्यवहार करण्यापेक्षा डिजिटल पेमेंटद्वारे ट्रान्झॅक्शन करण्यावर जास्त भर देताना दिसतायत.मात्र आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणे चांगलेच महागात पडणार आहे. नेमका युझर्सना काय फटका बसणार आहे, जाणून घेऊयात...  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेटीएम युझर्ससाठी मोठी बातमी आहे.पेटीएमने आता एका विशिष्ट सेवेवर सुविधा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. जर तुम्ही तुमचा मोबाईल पेटीएमने रिचार्ज केला तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहेत. 


'या' युझर्सना फटका 
जर तुम्ही विचार करत असाल की कोणत्या यूजर्सला हे विशेष सुविधा शुल्क भरावे लागेल, तर आम्ही तुम्हाला सांगु इच्छीतो की, जो कोणी वापरकर्ता पेटीएमद्वारे 100 रुपये किंवा त्याहून अधिकचा मोबाइल रिचार्ज करतो, त्यांना सुविधा शुल्क द्यावे लागेल. जेव्हा तुम्ही UPI, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे रिचार्जचे पेमेंट करता त्यावेळेस हे शुल्क आकारले जाणार आहे. पेटीएम सुविधा शुल्क एक रुपया ते सहा रुपयांदरम्यान आकारणार आहे. 


युझर्सचा संताप 
2019 मध्ये पेटीएमने स्वतःच आपल्या वापरकर्त्यांना ट्विट करून आश्वासन दिले होते की ते त्यांच्या कोणत्याही वापरकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क आकारणार नाही. मात्र आता पेटीएमने सुविधा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. पेटीएमच्या या निर्णयावर युजर्स संताप व्यक्त करतायतं.