नवी दिल्ली : व्हाॅट्स अॅप सातत्याने नवनवे फीचर्स लॉन्च करत आहे. व्हिडीओ चॅटची सुविधा दिल्यानंतर पाठवलेला मेसेज डिलीट करण्याचे नवे फीचर व्हाॅट्स अॅपने सुरु केले आहे. आता  व्हाॅट्स अॅपच्या पावलावर पाऊल टाकत डिजिटल वॉलेट पेटीएम ने देखील ही सुविधा सुरु केली आहे. या फीचरला पेटीएम ने 'इनबॉक्स' असे नाव दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे फीचर म्हणजे मेसेजिंग फॅसिलिटी आहे. यात युजर आपल्या मित्र-नातेवाईकांबरोबर चॅट करण्यासोबत पैसे मागू किंवा पाठवू शकतात. हे फीचर सुरक्षित असून त्यात तुम्ही पर्सनल गप्पा करू शकता. तसेच ग्रुप बनवून चॅट करू शकता. तसेच फोटो, व्हिडीओ पाठवू शकता. इतकंच नाही तर तुमचे लाईव्ह लोकेशन समजण्यास देखील त्याची मदत होईल. त्याचबरोबर 'डिलीट फॉर ऑल' हे ऑप्शन दिल्यामुळे तुम्ही पाठवलेला मेसेज डिलीट करू शकता. 


सध्या पेटीएम 'इनबॉक्स' अॅनरॉईडवर उपलब्ध आहे आणि लवकरच आयओएस वर उपलब्ध केले जाईल. पेटीएम   यांनी सांगितले की, "पेटीएम वापरणारे युजर्स, व्यापारी एकमेकांशी बोलू इच्छितात. त्यामुळेच आम्ही हे फीचर सुरु करत आहोत." 'पेटीएम इनबॉक्स' आपल्या युजर्सच्या गरजा  करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमंडळी आणि व्यापाऱ्यांसोबत चॅट करू शकाल. त्याचबरोबर तुमचा व्यवहार देखील सुरक्षित होईल. 


पेटीएम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या २७ कोटी युजर्स आणि ५० लाख मर्चेट ला ही सुविधा शुक्रवारपासून उपलब्ध करून देणार आहे. 


 मात्र पेटीएम हे फीचर साठी मोठी स्पर्धा ठरणार आहे. त्यामुळे चा वापर कमी होण्याची शक्यता आहे.