Petrol Pump Fraud Fuel Density: 'झीरो बघा' हे दोन शब्द तुम्ही पेट्रोल पंपावर (Petrol Pump) गेल्यानंतर नक्कीच ऐकले असतील. अगदी तुम्ही कारमध्ये इंधन भरायला गेलेला असाल किंवा टू व्हिलरमध्ये इंधन भरत असाल पंपावरील कर्मचारी हे दोन शब्द (Zero At Petrol Pump) तुम्हाला इंधन भरण्यास सुरुवात करण्याआधी नक्कीच सांगतो. पेट्रोलपंप मालकांकडून फसवणूक केली जात नाहीय हे सुनिश्चित करण्यासाठी हा शून्य पाहण्यास सांगितलं जातं. अर्थात इंधन भरण्यास सुरुवात करण्याआधी हा शून्य पाहणं फार महत्त्वाचं असतं. अनेकदा आपलं लक्ष हे किती इंधन भरलं जात आहे याकडे आणि त्याची किंमत किती होते याकडे असतं. त्यातही अनेकदा आपल्यापैकी बरेचजण थेट 100, 200 किंवा त्या पटीत इंधन भरण्यास सांगतात आणि इंधन भरुन झाल्यावर निघून जातात. सांगितलंय तेवढ्या किंमतीचं पेट्रोल भरलं असणार असं केवळ त्या शून्यवरुन सुरुवात झाल्याच्या आधारे मानून ग्राहक पंपावरु निघून जातात. मात्र असं करणाऱ्यांबरोबरही फसवणूक होऊ शकते असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे.


पेट्रोलचा दर्जा महत्त्वाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर किती पेट्रोल टाकलं जात आहे याचबरोबर कोणत्या दर्जाचं पेट्रोल टाकलं जात आहे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. अनेकजण पेट्रोल आणि डिझेलच्या शुद्धतेबद्दल त्याच्या दर्जाबद्दल अनभिज्ञ असतात. मात्र याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं. इंधनाचा दर्जा का महत्त्वाचा असतो याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहेत कारण इंधनाचा दर्जा गाडीच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो.


कुठे दिसते ही आकडेवारी?


किंमत आणि किती इंधन भरलं गेलं आहे याचबरोबर पेट्रोल पंपावर आणखीन एक आकडेवारी दिसते. ती म्हणजे इंधनाची घनता. म्हणजेच फ्युएल डेन्सिटी. ही घनताच इंधनाचा दर्जा कसा आहे हे ठरवण्यास फायद्याची ठरते. केंद्र सरकारने फ्युएल डेन्सिटीसंदर्भातील काही नियम निश्चित केले आहेत. याच इंधनामध्ये भेसळ असेल तर त्याचा परिणाम इंधनाच्या डेन्सिटीवर होतो. ही डेन्सिटी कमी असेल तर इंधनात भेसळ आहे असं समजावे. आता इंधनची घनता कशी तपासावी असा प्रश्न पडला असेल तर इंधन गाडीमध्ये टाकल्यानंतर हे तपासून पाहण्याची गरज नाही. इंधनाच्या घटनतेची माहिती पेट्रोल पंपावर इंधनाच्या दराच्या खालीच दिलेली असते. प्रत्येक पंपावर ही माहिती दिलेली असते. पेट्रोलच्या बीलावरही फ्यूएल डेन्सिटीसंदर्भातील माहिती दिलेली असते. 


किती असावी घनता?


प्रत्येक पदार्थाची एक घनता असते. इंधनाचीही निश्चित अशी घनता असते. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नुसार इंधन भरुन घेणाऱ्या ग्राहकांना इंधनाची घनता किती आहे हे तपासून पाहण्याचा अधिकार असतो. सरकारने इंधन टेन्सिटीचे काही मानक निश्चित केले आहेत. यानुसार पेट्रोलची घनता ही 730 ते 800 किलोग्राम प्रति घन मीटर असते. तर शुद्ध डिझेलची घनता ही 830 ते 900 किलोग्राम प्रति घन मीटरदरम्यान असते. इंधनाच्या घनतेवर तापमानाचा परिणाम होतो. या निश्चित घनतेपेक्षा कमी घनतेचं इंधन पेट्रोल पंपावर मिळत असेल तर यासंदर्भातील तक्रार तुम्ही करु शकता.