ड्रायविंग करताना `या` फोनमध्ये आपोआप सुरु होतो DND मोड...
अलीकडेच लाँच झालेल्या गुगलच्या पिक्सल फोनमध्ये एक खास सेंसर सुविधा उपलब्ध आहे.
सेन्ट फ्रांसिस्को : अलीकडेच लाँच झालेल्या गुगलच्या पिक्सल फोनमध्ये एक खास सेंसर सुविधा उपलब्ध आहे. हे खास फीचर म्हणजे ड्रायव्हिंग करताना 'डू नॉट डिस्टर्ब' ची सुविधा आपोआप चालू होते. गुगलने पिक्सल फोनसोबत 'पिक्सेल एंबिएंट सर्विसेज' नावाचा नवा अॅप देखील सुरु केला आहे.
गुगलने या अॅपच्या स्क्रीनशॉट मध्ये एक ऑटोमेटिक सेटिंग दिली आहे. ज्यामुळे युजर ड्रायव्हिंग करत असल्याचा अंदाज त्याला लागतो आणि तो आपली डीएनडी सेवा सुरु करतो. अप्पल आणि सॅमसंग च्या स्मार्टफोनमध्ये देखील 'डीएनडी' मोड फीच लाँच करण्यात आले आहे.
पिक्सल फोनमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. देशात पिक्सल २, पिक्सल २ एक्सएल स्मार्टफोन आणि ड्रेडीम व्यू वर्चुअल रियलिटी (वीआर) हॅन्डसेट नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे.
पिक्सल २ मध्ये एअरपीस तुम्ही स्टीरियो स्पीकर म्हणून देखील वापरू शकता. बॅक कॅमेऱ्यासहीत LED फ्लॅश उपलब्ध आहे. फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. याशिवाय USB Type C पोर्ट देखील स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.