नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे केबल आणि डीटीएचच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. हे नवे नियम आजपासून लागू झाले आहेत. या नियमाच्या अंतर्गत ग्राहकाला त्यांच्या आवडीच्या चॅनलची निवड करता येणार आहे. परंतु या चॅनलची निवड कशा प्रकारे करायची ही माहिती नसल्याने ग्राहक गोंधळून जातात. यासाठीच ट्रायने चॅनलची निवड करण्यासाठी नवीन वेब ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. यातून ग्राहकाला त्यांच्या मनपसंद चॅनलची कशाप्रकारे निवड करायची याची योग्य माहिती देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाइन चॅनल निवडण्याची प्रक्रिया -


१) या ऍप्लिकेशनचा उपयोग करण्यासाठी https://channel.trai.gov.in/ येथे जावे लागेल.


२) वेबसाइटवर गेल्यावर Get Started वर क्लीक करा,  क्लीक केल्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील.


३) सर्वात प्रथम ग्राहकाला त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. नाव, राज्य इत्यादी 


४) सर्व प्रश्नांचे योग्य उत्तर दिल्यावर ग्राहकाला त्याच्या नावासमोर चॅनलची यादी दाखवण्यात येणार आहे


५) ग्राहकाला त्याच्या आवडीच्या चॅनलसह मासिक योजनेचीही योग्य माहिती मिळणार आहे. View Selection बटणावर क्लीक केल्यावर तुम्ही    निवडलेल्या चॅनलचे मूल्य दाखवण्यात येणार आहे.


६) या वेबसाईटवर फ्री चॅनेल, पेड चॅनल यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 


७)  जर ग्राहकाला त्यांच्या आवडीच्या चॅनलचे दर जास्त वाटत असल्यास त्यांच्यासाठी दुसरा पर्याय देण्यात आला आहे.


८) चॅनेल निवड ऍप्लिकेशनच्या उजव्या बाजूस चॅनलची किंमत, एचडी / एसडी, ब्रॅाडकॉस्टर आणि भाषांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ग्राहक त्याच्या गरजे प्रमाणे चॅनेल सेट करु शकतो.