5G तुमच्या मोबाईलमध्ये चालणार का? असं करा चेक
5G Launch in India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G चे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल.
5G Network : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G चे (5G Internet Service) उद्घाटन करण्यात आले. दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित प्रदर्शनात मोदींनी देशभरातील निवडक 13 शहरांमध्ये 5G लाँच केले. 5G मुळे देशातील इंटरनेट वापरकर्त्यांना कमी वेळात व कमी दरात 10 पट वेगवान नेटवर्क वापरता येणार आहे.
दरम्यान 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल. भारतात आजपासून 5G इंटरनेट सेवा सुरु होणार असून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
या सेवेनंतर इंटरनेट स्पीडवर मोठा फरक पडणार आहे. याचा मोठा फायदा कम्युनिकेशन स्पीड सुधारण्यासाठी होणार आहे. आता तुमच्या फोनमध्ये 5G चालणार की नाही हे तुम्ही कसं तपासू शकता ते जाणून घेऊया...
वाचा : 5G in India : आजपासून इंटरनेट सुस्साट, 'या' शहरात मिळेल 5G सेवा, पाहा डिटेल्स
5G सपोर्ट अशा प्रकारे तपासला जाऊ शकतो?
- सुरूवातीला स्मार्टफोनच्या सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जावं लागेल.
- त्यापैकी तुम्हाला Connection किंवा Wi-Fi & Network वर क्लिक करावं लागेल.
- आता यूजर्सला Sim and Network या पर्यायावर जावं लागेल.
- काही स्मार्टफोनमध्ये हा पर्याय Mobile Networkच्या पर्यायात उपलब्ध असेल.
- येथे तुम्हाला Network Mode पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला Preferred Network Type वर जावं लागेल. तुम्हाला येथे 5G नेटवर्कचा पर्याय दिसतो का?
- जर उत्तर हो असेल तर याचा अर्थ तुमचा फोन 5G नेटवर्कसाठी तयार आहे. आपण इच्छित असल्यास आपण थेट पसंतीचे नेटवर्क प्रकार शोधून ही सेटिंग तपासू शकता.
- तुम्ही इतर मार्गांनीदेखील 5G नेटवर्क सपोर्ट तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. येथे यूजर्सला त्यांच्या स्मार्टफोनचे मॉडेल शोधावं लागेल.
- 5G बँडच्या तपशीलांमध्ये त्याची स्पेसिफिकेशन तपासावी लागतील. भारतात सेवा देणाऱ्या टेलिकॉम ऑपरेटर्स सर्व्हिस प्रोव्हायडरचे निश्चित बँड तुमच्या फोनमध्ये असतील, तर नक्कीच तुमच्या फोनला 5G सपोर्ट मिळेल.