मुंबई : Poco X2 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. Xiaomi द्वारा Pocoला भारतात स्वतंत्र्य ब्रँड घोषित केल्यानंतर हा पहिला स्मार्टफोन आहे. पोको एक्स २ स्मार्टफोन भारतात १५,९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे. ११ फेब्रुवारीपासून Poco X2ची विक्री सुरु होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Poco X2 भारतात तीन वेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 


- ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह Poco X2 १५,९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला आहे.
- त्यासोबत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह Poco X2 १६, ९९९मध्ये लॉन्च झाला आहे.
- तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला पोको एक्स २ १९,९९९ किंमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. 


Poco X2 स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ११ फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. लॉन्च ऑफरदरम्यान, आयसीआयसीआय (ICICI) बँकच्या क्रेडिट कार्डवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.


काय आहेत फिचर्स -


- Poco X2मध्ये बॅक-फ्रंटला Corning Gorilla Glass 5 देण्यात आली आहे. 
- ६.६७ इंची फुल एचडी डिस्प्ले
- 2400 x 1080 पिक्सल रेझल्यूशन 
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G Adreno 618 ग्राफिक प्रोसेसर
- क्वार्ड रियर कॅमेरा सेटअप
६४ मेगापिक्सल Sony IMX686 सेन्सर
८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड एँगल लेन्स
२ मेगापिक्सल सेन्सर - डेप्थ आणि मॅक्रो शूटिंगसाठी
- सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल सेंन्सर देण्यात आला आहे. 
- MIUI 11 बेस्ड Android 10 आणि hybrid SIM स्लॉट आहे.
- 4,500mAh बॅटरी
- 27W  फास्ट चार्ज सपोर्ट
- WiFi 802.11ac, Bluetooth 5.0, NFC, GPS, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.



Poco X2 Phoenix Red, Atlantis Blue आणि Matrix Purple रंगात लॉन्च करण्यात आला आहे.