Poco X5 Pro 5G Launching: पोकोने आज आपला मिड-रेंज स्मार्टफोन पोको एक्स5 Pro लॉन्च (Poco X5 Pro 5G) करण्याचा तयारीत आहे. पोको हा फोन रिलिज इव्हेंट आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. या फोनचं लाइव्ह स्ट्रीमिंग फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर केलं जाणार आहे. पोकोच्या ट्विटर पोस्टनुसार नवीन फोन फ्लिपकार्टवर अर्ली एक्सेस सेलअंतर्गत उपलब्ध असेल.


स्पेसिफिकेशन्स काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉन्चिंगच्या आधी पोकोद्वारे फोनच्या काही खास स्पेसिफिकेशनबद्दल सांगण्यात आलं आहे. पोको एक्स 5 प्रो फाइव्ह जी (Poco X5 Pro) स्नॅपड्रॅगन 778G SoC असेल. एका लीक रिपोर्टनुसार बँकांची सूट वगैरे लक्षात घेतल्यास या फोनची किंमत 20 हजार 999 रुपये इतकी असेल. फोनची किंमत पाहून असं दिसून येत आहे की पोको एक्स फोर प्रोच्या तुलनेत अधिक महाग आहे.


108 मेगापिक्सल कॅमेरा


फोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येऊ शकतो. यामध्ये 108 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. 120 एच झेड अल्मोड डिस्प्ले आणि स्लिम डिझाइन प्रोफाइलबरोबर देण्यात आलं आहे. पोको एक्स फाइव्ह प्रो 67 डब्यू फास्ट चार्जिंगबरोबरच 5000 एमएएचच्या बॅटरीसहीत लॉन्च होणार आहे.


इतकी किंमत असू शकते


पोको एक्स फाइव्ह प्रोची किंमत 22 हजार 999 रुपयांपासून सुरु होण्याची चर्चा आहे. लॉन्च ऑफरअंतर्गत फ्लिपकार्ट आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना 2 हजारांची सूट देण्यात आली आहे. यामध्ये किंमत कमी होऊन 20 हजार 999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय पोको एक्स फाइव्ह प्रोची विक्री 13 फेब्रुवारीपासून सुरु होण्याची शक्यता आहे.