वाहनांच्या टायरमध्ये स्वत:च भरा हवा; पेट्रोल पंपावर जाण्याची कटकट संपली...
जेव्हा वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी जाणवते तेव्हा आपण जवळच्या पेट्रोल पंपावर जातो. मात्र पेट्रोल पंपावरील प्रचंड गर्दीमुळे आपला बराच वेळ वाया जात असतो. या सर्व त्रासामधून तुमची सुटका व्हावी यासाठी तुम्हाला आज अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काम खूप सोपे होईल.
Electric Air Pump : अनेकद भर रस्त्यात गाडी चालवताना गाडीचा टायर पंक्चर तरी होतो किंवा टायरमध्ये बिघाड तरी होतो. जेव्हा वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी जाणवते तेव्हा आपण जवळच्या पेट्रोल पंपावर जातो. मात्र पेट्रोल पंपावरील प्रचंड गर्दीमुळे आपला बराच वेळ वाया जात असतो.
या सर्व त्रासामधून तुमची सुटका व्हावी यासाठी तुम्हाला आज अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काम खूप सोपे होईल.
Portable Electric Tyre Air Pump हे एक लहान डिव्हाइस आहे जे एक पॉवरफुल कंप्रेसर आहे. टायरमध्ये हवा भरण्यासाठी तुम्ही ते कारमधील पॉवर सॉकेटशी कनेक्ट करू शकता. या डिव्हाइसच्या किंमतीविषयी बोलायचे झाल्यास हे डिव्हाईस तुम्ही अवघ्या २२९९ रुपयात खरेदी करू शकता.
हे डिव्हाईस म्हणजे एक पोर्टेबल एअर कंप्रेसर आहे. जो तुमच्या कारच्या पॉवर सॉकेटला जोडला जातो आणि तुमच्या कारचे चारही टायर काही मिनिटांत भरतो. हे डिव्हाइस इतकं लहान आहे की तुम्ही ते तुमच्या कारच्या सीटखाली ठेवू शकता. छोट्या बॅगेत ठेवू शकता तसेच तुम्ही ते खिशातही ठेवू शकता.