मुंबई : हिवाळा संपून आता उन्हाला चांगलीच सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा इतका दाह वाढला आहे, की मे महिन्यामध्ये काय परिस्थिती असेल, याचा विचारही अनेकांकडून केला जात नाही आहे. उन्हाळा वाढत असल्यामुळं एसी खरेदी करायचा विचारही अनेकांनीच केला असेल. (Summer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, एसीमुळं येणारा वीजबिलाचा आकडा पाहून हा निर्णय या अनेकांपैकी निम्म्या जणांनी मागेही घेतला असेल. पण, आता असं करण्याची गरज नाही... 


कारण, AC ला सध्या एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय समोर आला आहे. हा पर्याय आहे पोर्टेबल फॅनचा. 


Amazon वर सध्या पोर्टेबल फॅनचे बरेच पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही सोयीनुसार हवा तसा पोर्टेबल फॅन निवडू शकता. 


One94store Mini Portable USB Hand Fan: बिल्ड इन रिचार्जेबल बॅटरी असणाऱ्या या फॅनचा वापर तुम्ही टेबल फॅन म्हणून तुम्ही करु शकता. यामध्ये 3 ऍडस्टेबल स्पीड देण्यात आला आहे. हा फॅन 299 रुपयांना आहे. 


IN ONE 5 Watts Portable Electric Hand Fan: या फॅनमध्ये तांब्याची मोटर देण्यात आली आहे. फ्ल्यूड मॅकॅनिकल कवरसोबत येणारा हा फॅन 1 मीटरच्या अंतरावरूनही चांगली हवा देतो असा कंपनीचा दावा आहे. 


यामध्ये 2000 एमएएच इतकी बॅटरी आहे. फोल्डिंग ट्रायपॉड स्टँड असणाऱ्या या फॅनची किंमत 799 रुपये इतकी आहे. 


Geeky Portable Princess Rabbit Styled Rechargeable 2 Watts Handheld Fan: 659 रुपये किमतीचा हा फॅनही सध्या बराच ट्रेंडमध्ये आहे. या फॅनला रिचार्जेबल बॅटरीही देण्यात आली आहे.