Solar Generator: शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे अनेकदा कामांचा खोळंबा होता. कोविड काळात वर्क फ्रॉम होममुळे सर्वाधिक त्रास हा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने झाला. त्यामुळे यासाठी काहीतरी पर्याय असावा असं वाटत होतं. आता तुमची प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल. कारण सोलार जनरेटर उपकरणामुळे स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक उपकरणं चार्ज करू शकता. सौर उर्जेवर चालणाऱ्या या जनरेटमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. त्याचबरोबर आपल्या बजेटमध्ये आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला या गॅझेटबद्दल जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SARRVAD Portable Solar Power Generator ST-500


सौर उर्जेवर चालणाऱ्या जनरेटरचं नाव SARRVAD Portable Solar Power Generator ST-500 असं आहे. जनरेटर आकाराने खूपच लहान आहे आणि तुम्ही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेऊ शकता. टीव्ही आणि लॅपटॉप यांसारखी छोटी उपकरणे चालवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. काही तासांसाठी पॉवर बॅकअप प्रदान करण्यास सक्षम आहे. या जनरेटरची क्षमता 60000mAh items, SARRVAD 518 Wh/140000mAh,3.7V आहे. याद्वारे तुम्ही तुमचा आयफोन 25 वेळा चार्ज करू शकता. 


जनरेटर सूर्यप्रकाशात 100W ते 110W, 18-24V/5A सोलर पॅनेलसह चार्ज करू शकता.  यासाठी थोडा जास्त वेळ लागतो परंतु हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. पॉवर सॉकेटच्या मदतीने देखील चार्ज करू शकता. वॉल सॉकेटच्या माध्यमातून पूर्ण चार्ज होण्यासाठी 7 ते 8 तासांचा अवधी लागतो. या सोलर पॉवर जनरेटरची किंमत 52 हजार रुपये आहे.


सोलार जनरेटर इतकं लहान आहे की, बॅगमध्ये कुठेही नेऊ शकता. यामुळे तुमचा लॅपटॉप, रेडिओ, पॉवर बँक, स्मार्टफोन यासह कोणतीही लहान उपकरणे चार्ज किंवा ऑपरेट करू शकता. अडचणीच्या परिस्थितीत हे गॅझेट खूप उपयुक्त ठरू शकते.