Pulsar 220F बाईकमध्ये आकर्षक बदल !
पल्सर २२० एफचा नवा ऍडिशन बाजारात दाखल झाल्यानंतर इतर कंपन्याना याचा मोठा फटका बसणार
नवी दिल्ली: बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बजाज कंपनीने त्याच्या पल्सर २२० एफ बाईकमध्ये आकर्षक असा बदल केला आहे. त्याचबरोबर कंपनीकडून या बाईकमध्ये ग्राफिक्सचा समावेश करण्यात आला आहे. याआधी बजाज कंपनीच्या पल्सर २२० बाईकला अनेकांनी पसंती दाखवली होती. बाईक चाहत्याकडून मोठा प्रतिसाद मिळला होता. काही वेळेनंतर या बाईकमध्ये अनेक बदल घडवले गेले. त्यानंतर या बाईक खरेदी करण्याचे प्रमाण वेगाने वाढू लागले. यासाठीच बजाज कंपनीने या बाईकमध्ये नवा बदल घडवून बाईकच्या चाहत्यांना आणखी आकर्षित करण्याचे ठरवले आहे. तज्ञानुसार, पल्सर २२० एफचा नवा ऍडिशन बाजारात दाखल झाल्यानंतर इतर कंपन्याना याचा मोठा फटका बसणार, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील एक्स शोरुममध्ये या बाईकची किंमत ९६ हजार ४२२ रुपये आहे. काही महिन्यातच या बाईकची खरेदी करता येणार आहे. असे कंपनीने सांगितले आहे.
बजाज पल्सर २२० एफचे वैशिष्ट्ये
बाईकमध्ये २२० सीसी इंजीन देण्यात आले आहे. हे इंजीन ८ हजार ५०० आरपीएमवर २१ पीएसची पॉवर जनरेट करणार आहे. वबाईकमध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. तसेच बाईकमध्ये २३० एमएमचा डिस्क ब्रेकचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीकडून या बाईकमध्ये एबीएस सिस्टम लावण्यात आले आहे. तसेच १२५ बजाजच्या १२५ सीसी वरील बाईकमध्ये एबीएस देण्यात आले आहे. १ एप्रिलपासून प्रत्येक बाईकमध्ये एबीएस यंत्रणेला सरकारने अनिवार्य केले आहे. बजाज कंपनीची पल्सर २२० एफ ही बाईक ब्लू आणि रेड ओव्हर ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे.