Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श या अलिशान स्पोर्ट्स कारने एका दुचाकीला धडक दिली आहे. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. अनिस अवधिया आणि आश्विनी कोस्टा अशी दोघा मृतांची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, 17 वर्षांचा मुलगा गाडी चालवत होता. तसंच, या मुलाकडे असलेली कारची नोंदणीच झाली नसल्याचेही समोर आले आहे. पुण्यातील या अपघातानंतर पोर्शे ही कार चर्चेत आली आहे. पोर्श ही एक लक्झरी कार आहे. याची किंमतदेखील कोटींच्या घरात आहे. आज या कारची किंमत व फिचर्स जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात ज्या कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला ती पोर्श Taycan ही आहे. दिसायला अत्यंत आकर्षक असलेल्या या कारमध्ये लक्झरी फिचर्स देण्यात आले आहेत. पोर्श टायकनमध्ये मॅट्रिक्स डिझाइन एलईडी हेडलाइट्स आहेत. तर, टर्बो मॉडेल्समध्ये एचडी मॅट्रिक्स डिझाइन एलईडी हेडलाइट देण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर, कारमध्ये 360 डिग्री व्ह्यू कॅमेराची सुविधादेखील देण्यात आली आहे. 


पोर्श टेक्कन ही एक स्पोर्ट्स कार आहे. कारची टॉपस्पीड 302 किमी प्रति तास इतका आहे. तर, या कारमध्ये एकाच वेळी 5 जण बसू शकतात. पोर्शे टेक्कन कारमध्ये 3 वर्षाच्या बॅटरीची गँरटी आहे. तर, बॅटरीची क्षमता 60 हजार किलोमीटरपर्यंत कार धावू शकते. ही कार 300 KW किंवा 408 Ps ची पॉवर जनरेट करते. पोर्शे कारचा टॉप स्पीड 230 Kmph इतका आहे. तर, ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी 4.8 सेकंद घेते. पोर्शे टेक्कनचे अलीकडेच इलेक्ट्रिक व्हर्जनदेखील बाजारात आले आहे. ही स्पोर्ट्स कार पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8 तासांचा वेळ घेते. 


कारची किंमत किती?


पोर्श कारची किंमत करोडोंच्या घरात आहे. फिचर्स आणि पॉवर यामुळं पोर्शे कार अनेक सेलिब्रेटींचीही आवडती आहे. भारतातील अनेक बड्या कलाकांनी पोर्शे कार खरेदी केलेली आहे.  Porsche Taycan ची एक्स शोरुम किंमत 1.61 कोटी रुपयांपासून सुरू होते. तर, 2.44 कोटी रुपयांपर्यंत या कारची किंमत जाते. 


वडिलांना अटक


पुणे अपघात प्रकरणातील त्या मुलाच्या वडिलांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विशाल अग्रवाल ला संभाजीनगर मध्ये पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने येऊन अटक केली पहाटेच्या सुमारास रेल्वे स्टेशन जवळील अगदी छोट्या हॉटेलमध्ये ही कारवाई झाली. कुणाला संशय येऊ नये म्हणून रेल्वे स्टेशन जवळील अत्यंत साध्या आणि स्वस्त हॉटेलमध्ये तो थांबला होता मात्र पोलिसांनी याची माहिती घेतली आणि पहाटेच्या दरम्यान त्याला तिथून अटक केली.