Digital Payment ने आर्थिक नुकसान होतंय? काय आहे नेमकं प्रकरण?
Net Banking,UPI पेमेंट सिस्टम, credit आणि debit card यांसारख्या डिजिटल पेमेंट सिस्टमवर लोकांचे अवलंबित्व खूप वाढले आहे. मात्र आता सावध राहावे लागेल, कारण...
मुंबई: गेल्या काही वर्षामध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा वापर भारतात खूप वेगाने वाढला आहे. परिणामी Net Banking, UPI पेमेंट सिस्टम, credit आणि debit card यांसारख्या डिजिटल पेमेंट सिस्टमवर लोकांचे अवलंबित्व खूप वाढले आहे. मात्र आता सावध राहावे लागेल, कारण UPI व्यवहारांवरही तुमचे शुल्क कापले जाऊ शकतात.
रिझव्र्ह बँकेने (Reserve Bank) ‘चर्चा पेपर इन चार्जेस इन पेमेंट सिस्टम’ (Discussion Paper in Charges in Payment Systems) जारी केला आहे. दरम्यान या अहवालानुसार रिझर्व्ह बँक पेमेंट सिस्टम आणि पेमेंट सेटलमेंटसाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा खर्च वसूल करण्यासाठी पर्याय शोधत आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या पेपरमध्ये, UPI चे वर्णन IMPS प्रमाणेच निधी हस्तांतरण प्रणाली म्हणून केले आहे. अशा परिस्थितीत, UPI साठी IMPS सारख्या निधी हस्तांतरण व्यवहारांवर शुल्क आकारण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतात. वेगवेगळ्या रकमेवर शुल्क आकारले जाऊ शकते, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
तसेच UPI सोबतच, रिझर्व्ह बँकेने डेबिट कार्ड (Debit card) व्यवहार, RTGS, NEFT इत्यादींच्या शुल्कावरही टिप्पण्या मागितल्या आहेत. त्याचवेळी, रिझव्र्ह बँकेचे म्हणणे आहे की, आम्ही पैसे कमावण्यासाठी हे सर्व करत आहोत, असा विचार करू नये. तर आम्ही तयार केलेल्या व्यवस्थेत खर्च केलेला पैसा परत आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे फोन पे, पेटीएम किंवा डेबिट कार्डवरून अधिक व्यवहार करताना काळजीपुर्व करा.