नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपनी 'रियलमी'ने Realme सोमवारी भारतीय बाजारात पहिल्यांदा स्मार्ट टीव्ही सीरीज आणि वॉच लॉन्च केलं आहे. 'रियलमी'च्या स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत 12 हजार 999 रुपये इतकी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने मीडियाटेक 64-बीट क्वाड-कोर प्रोसेसर आणि डॉल्बी ऑडिओ-सर्टिफाइड 24 वॉट क्वाड स्टिरियो स्पीकरसह स्मार्ट टीव्ही बाजारात आणला आहे. कंपनीकडून टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी आणि एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देण्यात येत आहे. हा स्मार्ट टीव्ही नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि प्राईम व्हिडिओ यासारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या सुविधेसह बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. या टीव्हीला क्रोमा बूस्ट तंत्रज्ञान देण्यात आलं आहे, जे 400 एनटीएस अल्ट्रा ब्राइटनेस प्रदान करु शकेल. 


'रियलमी'च्या 32 इंची टीव्हीची किंमती 12 हजार 999 रुपये इतकी आहे. तर 43 इंची टीव्हीसाठी 21 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहेत. रियलमी स्मार्ट टीव्हीची विक्री रियलमी डॉट कॉम आणि फ्लिपकार्टवर 2 जूनपासून सुरु होणार आहे.



रियलमीने स्मार्ट टीव्हीशिवाय, स्मार्च वॉचही लॉन्च केलं आहे. या स्मार्ट वॉचमध्ये 1.4 इंची कलर टचस्क्रिन, रियल टाईम हार्ट रेट मॉनिटर आणि एसपीओ2 मॉनिटर म्हणजेच ब्लड-ऑक्सिजन लेव्हल यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. हे वॉच 2.5 डी कॉर्निंग गोरिला ग्लास-3 प्रोटेक्शनसह लॉन्च केलं आहे. वॉचमध्ये आयपी68 रेटिंग देण्यात आलं आहे. याचा अर्थ धूळ आणि पाण्यापासून या वॉचचा बचाव केला जाईल. याचा बॅटरी बॅकअप सात ते नऊ दिवसांपर्यंत आहे. शिवाय पॉवर-सेव्हर मोडमध्ये या वॉचची बॅटरी 20 दिवसांपर्यंत टिकू शकते.



'रियलमी' स्मार्ट वॉचची किंमत 3,999 रुपये इतकी आहे. 5 जूनपासून हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. रियलमी डॉट कॉम आणि फ्लिपकार्टवर 2 जूनपासून विक्री सुरु होणार आहे.