मुंबई :  अ‍ॅपलचा आयफोन आपल्याकडेही असावा असे प्रत्येकाला वाटते. आयफोनचे खास फीचर्स, कॅमेरॅची क्लिअ‍ॅरिटी आणि खास स्टेटस सिंबल चारचौघांकहे लक्ष खेचून घेतो. आयफोनची किंमत पाहता अनेकजण हा फोन ईएमआयवर विकत घेण्याचाही विचार करतात. पण इतकी आर्थिक तडजोड करून आयफोन घेण्याआधी त्यापेक्षा अ‍ॅन्ड्रॉईड फोन या ५ कारणांसाठी किती किफायतशीर हे जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) चार्जिंग - आयफोनमध्ये चार्जिंगसाठी लाइटनिंग कनेक्टर  असतो. यामुळे तुमचा फोन हळूहळू  चार्ज होतो. या उलट गूगल पिक्सल आणि  सॅमसंग J7 मध्ये टाईप सी चार्जिंग पोर्ट दिलेला असतो. यामुळे फोन झटपट चार्ज होतो. काही एलजी आणि सॅमसंगच्या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सोय देण्यात आली आहे. पण ही सोय आयफोनमध्ये अजूनही देण्यात आलेली नाही. 


२)इंटर्नल मेमरी -सुरक्षेच्या कारणास्तव अ‍ॅपलच्या फोनमध्ये फिक्स्ड इंटरनल मेमरीचा पर्याय दिलेला असतो. आयफोन १६ जीबी, ३२ जीबी, ६४ जीबी आणि १२८ जीबी मध्ये उपलब्ध आहे. अ‍ॅन्ड्रॉईडच्या स्मार्टफोनमध्ये एक्सटर्नल मेमरीचाही स्लॉट दिला जातो. 


 ३)सिम स्लॉट - अनेक फोनमध्ये दोन सीम वापरू शकाल अशी सोय दिली जाते. पण आयफोनमध्ये मात्र अजूनही केवळ सिंगल सीमची सोय दिली आहे. त्यामुळे अनेकदा दुसरा फोन तुम्हांला सोबत ठेवावा लागतो.
 
 ४) ब्राऊजर - अ‍ॅन्ड्रॉईड फोनमध्ये एकापेक्षा अधिक ब्राऊजर वापरण्याची सोय असते. पण आयफोनमध्ये मात्र हा पर्याय मिळत नाही. तुम्हांला डिफॉल्ड ब्राऊजर वापरणं बंधनकारक आहे. 
 
५)थर्ड पार्टी अ‍ॅप - डाटा चोरी होऊ नये तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अ‍ॅपल आपल्या फोनमध्ये कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप वापरण्याची परवानगी देत नाही.