मुंबई : तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याची वाट पाहत असाल आणि तोही बजेटमध्ये... तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे... हा फोन केवळ तुमच्या बजेटमध्येच बसणार नाही तर ऑफिरसहीत तुम्हाला मिळेल. कमी किंमतीत अत्यंत उपयोगी स्मार्टफोन विकत घेण्याची संधी शाओमी कंपनीनं उपलब्ध करून दिलीय. शाओमी रेडमी नोट ४ वर सूट मिळतेय. याबद्दल माहिती शाओमी इंडियाचे प्रमुख आणि शाओमीचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विटद्वारे माहिती दिलीय. 


हजार रुपयांची सूट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दमदार ऑफरसाठी तुम्हाला फ्लिपकार्ट आणि एमआयडॉटकॉम साईटवर जाण्याची गरज नाही. मनु कुमार जैन यांच्या म्हणण्यानुसार, भारतात सर्वात जास्त विकणारा स्मार्टफोन रेडमी नोट ४ च्या किंमतीत हजार रुपयांची कपात करण्यात आलीय. त्यामुळे या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटचा स्मार्टफोन ११,९९९ रुपयांत खरेदी करू शकतात. लॉन्चिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत १२,९९९ रुपये होती. 


फ्लिपकार्टची ९९ रुपयांची ऑफर


कंपनीच्या फोनच्या किंमतीत कपात करण्याची फ्लिपकार्टनं सुरुवात केली होती. या एक्सचेंड ऑफरमध्ये ग्राहकांना केवळ ९९९ रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टच्या रेडमी नोट ४ चा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरियंटचा ११,९९९ रुपयांचा फोनवर तब्बल ११,००० रुपयांचा एक्सचेंज ऑफर देत आहे. 


याशिवाय १०,००० रुपयांत मिळणारा ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी व्हेरियंटला सूटसोबत ९,९९९ रुपयांत आणि एक्सचेंज ऑफर (९००० रुपयांत एक्सचेंज ऑफर) मध्ये केवळ ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या ऑफरचा डिस्काऊंट तुमच्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या फोनवर आधारित आहे.