मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांना मोठा झटका दिला असताना अन्य मोबाईल कंपन्या तसाच कित्ता गिरवतील, अशी शक्यता होती. मात्र, व्होडाफोनने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. इतर नेटवर्कवर व्होडाफोन कॉलवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आम्ही आपल्याशी जे वचन दिले आहे त्याचा आनंद घेत रहा, व्होडाफोन अमर्यादित योजनांवर खरोखर विनामूल्य कॉल करु शकता, असे ट्विट व्होडाफोनने केले आहे. फ्री म्हणजे फ्री अमर्यादित असे म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना १० ऑक्टोबर २०१९ पासून मोठा झटका दिला आहे. अन्य कंपन्यांच्या वापरकर्त्यांना आऊटगोईंग कॉल करणे फ्री असणार नाही. त्यामुळे जिओ सेवा घेणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का होता. तुम्ही तुमच्या जिओ सिमकार्डवरून जिओशिवाय इतर कंपनीच्या युझर्सना कॉल केला, तर त्यासाठी तुम्हाला प्रतिमिनिट सहा पैसे आकारले जात आहे. त्यामुळे व्होडाफोनही तसेच करील अशी भीती वर्तविण्यात आली होती. आता व्होडाफोनने तुम्ही बिनधास्त राहा, असे म्हटले आहे. कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे.



रिलायन्स जिओने मोठा गाजावाजा करत आपल्या ग्राहकांना सवलत दिली होती. मात्र, ही सवलत जिओने मागे घेतली आहे, आता दुसऱ्या नेटवर्कच्या युझर्सना जिओवरून कॉल करायचा असेल तर प्रतिमिनिट सहा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे व्होडाफोनची सुविधा ग्राहकांनी फायद्याची ठरत आहे.