iPhone ८ आणि iPhone ८ प्लसच्या प्री-बुकींगवर रिलायन्सकडून शानदार ऑफर
अॅपलने नुकतेच त्यांचे आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग भारतात सुरू झाली आहे. हे फोन घेणा-या ग्राहकांसाठी रिलायन्स डिजिटलकडून काही खास ऑफर्स दिल्या जात आहेत.
नवी दिल्ली : अॅपलने नुकतेच त्यांचे आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग भारतात सुरू झाली आहे. हे फोन घेणा-या ग्राहकांसाठी रिलायन्स डिजिटलकडून काही खास ऑफर्स दिल्या जात आहेत.
रिलायन्स डिजिटलकडून हे फोन घेणा-या ग्राहकांना प्री-बुकींगवर कॅशबॅक आणि बायबॅकसारख्या ऑफर देत आहेत. बायबॅक ऑफरनुसार आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस एक वर्षाने परत केल्यास ७० टक्के पैसे परत दिले जातील. तर सिटी बॅंकच्या क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास १० हजार रूपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफरही दिली जात आहे.
नवीन आयफोन रिलायन्स डिजिटलच्या स्टोरमध्ये जाऊन ऑफलाईन बुक करता येऊ शकतो. यासोबतच अॅमेझॉन, जिओ स्टोरवर सुद्धा आयफोनची ऑनलाईन बुकींग केली जाऊ शकते. २९ सप्टेंबरपासून भारतात या फोन्सची विक्री सुरू होईल.
अॅपलने आयफोन ८ च्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ६४ हजार रूपये इतकी ठेवली आहे. तर २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ७७ हजार रूपये आहे. आयफोन ८ प्लसच्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ७३ हजार रूपये आहे. तर २५६ जीबी फोनची किंमत ८६ हजार रूपये आहे.
आयफोन एक्स २७ ऑक्टोबरपासून प्री-बुकींगसाठी उपलब्ध होईल आणि ३ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. रिलायन्स जिओने आयफोन ८ साठी एक खास टेरिफ प्लॅन लॉन्च केला आहे. त्यानुसार जिओ त्यांच्या प्रिपेड ग्राहकांना ७९९ रूपयांमध्ये ९० जीबी डेटा देणार आहे. यासोबत मोफत व्हॉईस कॉल्स, एसएमएस आणि जिओ प्रिमियमचं सब्सक्रिप्शन सुद्धा मिळेल.