नवी दिल्ली : तुम्ही रिलायन्स जिओ फोन बुक केला होता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओ फोनची डिलिव्हरी रविवारी सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या १५ दिवसांत सर्व ग्राहकांना जिओ फोन डिलिव्हरी दिली जाणार आहे.


रिलायन्स जिओने १५०० रुपयांत आपल्या फिचर फोनची बुकींग सुरु केली होती. हे पैसे केवळ डिपॉझिट स्वरुपात घेतले जाणार आहेत. कंपनीने जाहीर केल्यापासून ग्राहक या फोनच्या प्रतिक्षेत आहेत.


रिलायन्स जिओच्या स्वस्त ४जी हँडसेटची डिलिव्हरी सर्वात आधी ग्रामीण भागांमध्ये केली जाणार आहे. त्यानंतर शहरी भागांतील ग्राहकांना हा फोन मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या फिचर फोनची प्री-बुकींग २४ ऑगस्टपासून सुरु करण्यात आली होती. त्यासाठी ग्राहकांना बुकींग दरम्यान ५०० रुपये द्यावे लागले होते. तर उरलेली रक्कम डिलिव्हरी घेताना द्यायचे आहेत.


तीन वर्षांनंतर फोन परत केल्यास ग्राहकांना त्यांचे १५०० रुपये परत केले जाणार आहेत. सूत्रांच्या मते, पहिल्या लॉटमध्ये ६० लाख जिओफोन्सची डिलिव्हरी १० ते १५ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर पुढील स्लॉटसाठीची प्री-बुकींग कधी सुरु होणार हे स्पष्ट होईल.