बेंगळुरू : जर तुम्ही गुंतवणुकीच्या हेतूने गुगल प्ले स्टोरवरून रिलायन्स जिओ कॉईनसोबत मिळतं जुळतं अ‍ॅप डाऊनलोड केलं असेल तर लगेच डिलिट करा. हे अ‍ॅप तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.


काय आहे प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ कॉइन नावाने गुगल प्ले स्टोरवर २२ बनावट आहेत. या अ‍ॅप्सची नावे जिओ कॉइन आणि जिओ कॉइन क्रिप्टोकरन्सीसोबत मिळतं जुळतं आहे. 


बनावट अ‍ॅप इतक्यांनी केले डाऊनलोड


गुगल प्ले स्टोरवरून यातील काही अ‍ॅप्स १ हजार पेक्षाही कमी लोकांनी डाऊनलोड केले आहेत. तर यातील तीन अ‍ॅप असे आहेत जे १ हजार ते ५ हजार लोकांनी डाऊनलोड केले आहेत. तसेच दोन अ‍ॅप १० हजार ते ५० हजार लोकांनी डाऊनलोड केले आहेत. 


काय लिहिलं आहे अ‍ॅप पेजवर?


या अ‍ॅप्सच्या पेजवर दावा करण्यात आला आहे की, काही खास कामं पूर्ण करण्यासाठी(काही वस्तू खरेदी करण्यासाठी) तुम्हाला जिओ कॉइल दिले जातील. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रसिद्ध रिलायन्स इंडस्ट्रीज यावर्षी आपली स्वत:ची क्रिप्टोकरन्सी लॉन्च करणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण अजूनतरी कंपनी आपल्या या योजनेबद्दलहीही खुलासा केलेला नाहीये. 


काय होऊ शकतो धोका?


सिक्युरिटी एक्सपर्टने अशाप्रकारे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापासून इशारा दिलाय. अशाप्रकारचे अ‍ॅप तुमची खाजगी माहिती चोरी करतात. पण यावेळी वेगळीच भीती आहे. सायबर सिक्युरिटी फर्म नेट मॉनेस्टरीचे फाऊंडर शोमीरॉन दास गुप्ता यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, या अ‍ॅप्समध्ये नव्या प्रकारचे मालवेअर असू शकतात. यामाध्यमातू तुमच्या फोनचं पजेशन पॉवर त्यांच्याकडे जाण्याची भीती असते. असे करून ते तुमच्या फोनमधील सगळी व्हर्चुअल करन्सी उडवू शकतात.


काही वर्षांपासून हे होतंय...


गेल्या काही वर्षात क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत वाढ बघायला मिळाली आहे. त्यामुळे सिस्टम रिसोर्सेजची मागणी वाढली आहे. बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगसाठी मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग पॉवरची गरज असते.