मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या ४ जी मोबाईल फोनची विक्री सुरु केली आहे. सुरुवातीला हा फोन बुकींग करुनही काही लोकांना मिळाला होता. आता हा फोन सगळ्यांना उपलब्ध झालाय.


अधिकृत संकेतस्थळावर विक्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओच्या ४ जी फीचर फोनची कंपनीने विक्री सुरु केली आहे. त्यासाठी तुम्हाला www.jio.com या कंपनी अधिकृत संकेतस्थळावरून हा मोबाईल विकत घेता येईल. 


मोफत फोन मिळणार!


जिओचा ४ जी फीचर फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना १५०० रूपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. १५०० रूपयांची ही अनामत रक्कम तीन वर्षानंतर ग्राहकांना परत मिळणार आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला मोफत मिळणार आहे. 


जिओचा फोन घेण्यासाठी..


- जिओच्या www.jio.com या संकेतस्थळावर जाच.


- संकेतस्थळ सुरु केल्यानंतर आधी तुम्हाला साईटवर जिओचा ४ जी फीचर फोन दिसेल.


- त्यानंतर नाऊ ऑर्डर या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिटवर क्लिक करा.


- मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर डिटेल्स मागितले जाईल. त्या डिटेल्समध्ये तुम्हाला पोस्टल कोड टाकायचा आहे.  


- जर दुसऱ्या नावांनी मोबाईल घ्यायचे असतील तर अॅड न्यू या ऑप्शनवर क्लिक करा. दुसरा मोबाईल नंबर आणि पोस्टल कोड टाकू शकता. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा. 


- प्रोसीड केल्यानंतर मोबाईलसाठी द्यावी लागणारे  १५०० रूपये भरण्यासाठी तुम्हाला सांगितले जाईल. पे या ऑप्शनवर क्लिक करा आणि पैसे भरा.


- पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर काही दिवसात जिओचा ४जी फीचर फोन आपल्या हातात पडेल.