Jio भारतीय बाजारात आणणार सर्वात स्वस्त 5G Smartphone! किंमत ऐकून विश्वास बसणार नाही, फीचर्सही आहेत जबरदस्त
रिलायन्स जिओ भारतीय मोबाईल बाजारात पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. लवकरच भारतीय बाजारात जिओ चा 5G स्मार्टफोन येणार आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झालेत. जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि फीचर्सबाबत.
Reliance Jio 5g smartphone: रिलायन्स जिओ भारतात त्यांची 5G सेवा लवकरच सुरु करणार आहे. भारतात 5G सुविधा प्रदान करणारं जिओचं सर्वात मोठं नेटवर्क असणार आहे. अशात रिलायन्स जिओ नेटवर्कसोबतच दमदार असा 5G स्मार्टफोन देखील लवकरच लॉन्च करणार आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन आणि त्याची किंमत लीक झाली आहे. या फोनची अधिकृत घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (RIL AGM) केली जाऊ शकते.
सर्वात आधी जाणून घेऊयात फोनच्या किमतीबाबत
Jio 5G Smartphone Price In India : समोर आलेल्या माहितीनुसार रिलायन्सच्या नव्या 5G स्मार्टफोनची किंमत साधारणतः 12 हजारांपर्यंत असू शकते. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या M13 5G या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची किंमत 13,999 इतकी आहे. अजूनही Micromax, Lava किंवा Karbonn या कंपन्यांनी त्यांचा 5G स्मार्टफोन बाजारात आणलेला नाही. त्यामुळे रिलायन्सचा हा फोन सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असणार आहे.
स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
एका इंग्रजी वृत्तसमूहाच्या रिपोर्टनुसार जिओ च्या 5G स्मार्टफोनसोबत अनलिमिटेड डेटा आणि व्हॉइस कॉलिंगची सुविधाही ग्राहकांना मिळू शकते.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 SoC प्रोसेसर, सोबत 4GB RAM आणि 32 GB इंटरनल मेमरी सपोर्ट असू शकतो.
6.5- इंचांचा HD+ IPS LCD डिस्प्ले आणि मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असू शकतो.
यामध्ये 13 Mega Pixel चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर पहिल्या मिळू शकेल. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा 8 MP चा पाहायला मिळू शकेल.
या फोनमध्ये जिओफोन नेक्स्टसाठी खास गुगलसोबत भागीदारी करून बनवलेलं प्रगती ओएस (Pragati OS) असू शकतं
कधी लॉन्च होणार?
जिओ कडून बाजारात आणला जाणारा नवा 5G फोन दिवाळीत बाजारात विक्रीसाठी येऊ शकतो.
विशेष सूचना - वरील फीचर्स हे लीक फीचर्स आहे. या फोनबाबत किंवा फोनच्या अधिकृत स्पेसिफिकेशन, लॉन्च तारीख आणि किमतीबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
reliance jio to launch cheapest 5G smartphone in indian mobile market know all specifications