मुंबई : रिलायन्स जिओने कोणत्याही नेटवर्कला मोफत व्हॉईस कॉल,स्वस्त दरात डाटा उपलब्ध करून दिल्यानंतर आता टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओने आता अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सच्या नियमांमध्ये मात्र बदल केले आहेत. पूर्वी अनलिमिटेड असणारा हा प्लॅन आता मर्यादीत करण्यात करण्यात आला आहे. 


नव्या प्लॅननुसार, दर दिवशी केवळ ३०० मिनिटं व्हॉईस कॉल्स मोफत दिला जाणार आहे. काही जण या सुविधेचा गैरवापर करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मिशियल किंवा चुकीच्या गोष्टींसाठी वापर केल्यास ३०० मिनिटांनंतर रिलायन्स जिओची व्हॉईस कॉलची सेवा खंडीत करण्यात येणार आहे. 


रिलायन्स जिओने ही सेवा केवळ वैयक्तिक कारणांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार,दर दिवसाला ३०० मिनिटे किंवा ७ दिवसांसाठी १२०० मिनिटं अशा स्वरूपात ग्राहकांना यापुढे व्हॉईल कॉलची सेवा उपलब्ध करून दिली जाईल.