नवी दिल्ली: गेल्या काही दिवसात तुमच्या Jio 4जीचे डाऊनलोड स्पीड कमी झाले आहे का? या प्रश्नाचे उत्तर अनेक जण होय असे देतील. कारण गेल्या काही दिवसांमध्ये Jio 4जीचे डाऊनलोड स्पीड खरोखरच कमी झाले आहे. त्या तूलनेत Jio 4जीचा प्रतिस्पर्धी असलेल्या एअरटेलचे स्पीड मात्र काही प्रमाणात वाढले आहे. टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ट्रायच्या मायस्पीड अॅपने या डेटा स्पीडबाबत खुलासा केला आहे. हा सलग दुसरा महिना आहे. ज्यात Jio 4जीचे स्पीड कमीच राहिले आहे. २०१८मध्ये जीओचे स्पीड कमी राहण्याची ही तिसरी वेळ आहे. पण, रिलायन्सच्या स्पर्धक कंपन्या एअरटेल, वोडाफोन आणि आयडीया आदी कंपन्या मात्र आपले स्पीड काय ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.


एअरटेल एकदम स्पीडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ओपनसिग्नलच्या एप्रिलमध्ये आलेल्या अहवालात म्हटले आहे की, Jio 4जी हे कार्यरत दिसते पण, पाहजे त्या वेगाने डाऊनलोड स्पीड देत नाही. पण, त्या तुलनेत एअरटेल चांगले स्पीड देते. एअरटेल ही देशातील सर्वात जास्त सबस्क्रायबर असलेली कंपनी आहे. तर जिओचा क्रमांक वोडाफोन आणि आयडियानंतर लागतो.


कोण किती स्पीडमध्ये?


ट्रायने मायस्पीड अॅपद्वारे शेअर केलेल्या डेटानुसार, Jio 4जी डाऊनलोड स्पीड एप्रिल २०१८ मध्ये १४.७ एमबीपीएस राहिला. तर, २ महिन्यात हेच स्पीड सुमारे ३३ टक्क्यांनी कमी दिसले. पहिले हे स्पीड २१.३ एमबीपीएस होते. त्यामुले Jio 4जीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वात जास्त डाऊनलोड स्पीड दिले. तेव्हा ट्रायच्या अॅपमध्ये २५.६ एमबीपीएस डाऊनलोड स्पीड रजिस्टर्ड केली होती. एअरटेलने ९.२ एमबीपीएससोबत एप्रिल २०१८मध्ये दुसरा, आयडियाने ७.४ एमबीपीएसमध्ये तिसरा तर वोडाफोनने ७.१ एमबीपीएसमध्ये चौथे स्थान पटाकवले.


अपलोडमध्ये आयडियाची बाजी


दरम्यान, अपलोडबाबत बोलायचे तर, आयडियाने ६.५ एमबीपीएस अपलोड स्पीडसोबत पहिला क्रमांक कयम ठेवला. त्यानंतर वोडाफोनचा क्रमांक लागतो. वोडाफोन ५.२ एमबीपीएस इतके स्पीड देतो. जिओ आणि एअरटेल हे अनुक्रमे ४ एमबीपीएस आणि ३.७ एमबीपीएससोबत तिसरा आणि चौथ्या क्रमांकावर राहतात.