मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची ४१ वी अॅन्युअल मिटींगमध्ये मुकेश अंबानींनी सांगितले की, येणाऱ्या वर्षात कंपनीत अनेक ट्रांसफॉर्मेशन होतील. गेली १० वर्ष रिलायन्ससाठी जबरदस्त होती. हायड्रोकार्बन व्यवहार खूप जलद वाढला. रिलायन्स देशातील सर्वात मोठे एक्सपोर्टर आहे. कंपनीचा नफा 20.5% वाढला. सध्याच्या घडीला रिलायन्स सर्वात अधिक टॅक्स भरणारी कंपनी आहे. Jio भारतातील सर्वात जलद गतीने सर्व्हीस देणारे नेटवर्क आहे. देशातील कानाकोपऱ्यात गावं Jio ने जोडली गेली आहेत. त्यामुळे जिओ आणि रिटेल व्यवहारात जरबदस्त नफा झाला. Jio ला  36,075 कोटींचा नफा झाला. वर्षभरात जिओचे ग्राहक दुप्पटीने वाढले. Jio ने प्रत्येक महिन्यात ग्राहकांना 240 GB डेटा देण्याची सुविधा सुरु केली.


जिओबद्दल...


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    गेल्या दोन वर्षात जिओने जबरदस्त रेकॉर्ड केले.

  • जगातील सर्वात मोठे नेटवर्क

  • जिओच्या ग्राहकांची संख्या दुप्पट

  • २२ महिन्यात जिओने २०.५ कोटी ग्राहक जोडले

  • जिओ प्रत्येक शहर, गाव आणि ग्रामपंचायतपर्यंत पोहचले.

  • जिओचे नेटवर्क ९९% लोकसंख्येपर्यंत

  • भारतात ३५ मिलियन जिओचे फोन युजर्स.


जिओ ब्रॉडब्रॅंड सर्व्हीस


मुकेश अंबानींनी सांगितले की, जिओ फायबर कनेक्टिव्हीटी संदर्भात काम सुरु आहे. फायबर ब्रॉडब्रॅंडमध्ये रिलायन्स मोठी गुंतवणूक करत आहे. देशातील प्रत्येक ठिकाणी फायबर नेटवर्क पोहचवणे हे आमचे लक्ष्य आहे.
आकाश आणि ईशा अंबानी यांनी जिओच्या गीगा फायबर सर्व्हीसची घोषणा केली. जिओ गीगा फायबर नेटवर्क ब्रॉडब्रॅंड सर्व्हीस आहे.


 


JioGigafiber सर्व्हीस लॉन्च


  • 'JioGigafiber'नावाने ब्रॉडब्रॅंड सेवा लॉन्च

  • फायबरमध्ये २४ तास इमरजेन्सी सेवा उपलब्ध असेल.

  • स्वस्त दरात ब्रॉडब्रॅंड कनेक्शन उपलब्ध होईल.

  • फिक्स्ड लाईन ब्रॉडब्रॅंडमध्ये टॉप ५ मध्ये पोहचण्याचे लक्ष्य

  • फायबर कनेक्टिविटीमध्ये २.५ लाख कोटी गुंतवणूक केली आहे.


Jio GIGA TV लॉन्च


  • व्हाईस कमांडवर टीव्ही चॅनल बदलता येईल

  • जिओ गीगा राऊटरही होईल लॉन्च

  • जिओ गीगा टीव्ही सेट टॉप बॉक्स लॉन्च

  • भारतात बदलेल टी.व्ही पाहण्याची पद्धत

  • टीव्हीत व्हॉईस कमांड फिचर मिळेल.