नवी दिल्ली : भारतात जवळपास ८८ टक्के ग्राहक ऑनलाइन पेमेन्टसाठी मोबाईलचा वापर करत असल्याची बाब एका अहवालातून समोर आली आहे. बिल भरण्यासाठी आणि फॅशन या दोन प्रमुख क्षेत्रात ऍपच्या माध्यमातून खरेदी केली जाते. अर्ध्यांहून अधिक ऑनलाइन विक्री येथूनच होत असल्याचं पेपाल आणि आयपीएसओएसच्या एका संयुक्त अहवालात सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास ५१ टक्के ऑनलाइन विक्री या शॉपिंग अ‍ॅप्सद्वारे केली जात असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. हा अहवाल २३ जुलै आणि २५ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या  जागतिक सर्वेक्षणातील एक भाग आहे.


'पेपाल द आयपीएसओएस एमकॉमर्स रिपोर्ट'मध्ये, ८८ टक्के भारतीय ग्राहक ऑनलाइन पेमेन्टसाठी मोबाईलचा वापर करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.


  


भारतात ८१ टक्के व्यापारी जागतिक सरासरीच्या ६३ टक्के व्यापाऱ्यांच्या तुलनेत, वाढती मागणी आणि ग्राहकांच्या प्राधान्यांना प्रतिसाद देण्यासाठी मोबाईल पेमेन्टचा वापर करण्यासाठी अनुकूल असल्याचंही अहवालात सांगण्यात आलं आहे.