मुंबई : गुगलचा पिक्सल 2 स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.  गुगलनं मागच्या वर्षी पिक्सल डिव्हाईस बाजारात उतरवून आगमन केलं. सध्या तरी अॅपल आणि सॅमसंगच्या फोनचीच बाजारात चलती असली तरी हा स्मार्टफोन अॅपल 8 प्लसला टक्कर द्यायची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल पिक्सल 2ची स्क्रिन ६ इंचांची आहे, ज्याचा एसपॅक्ट रेशो १८:९ आहे आणि स्क्रिन बॉडी रेशो ७६.५ टक्के आहे. गुगलचा हा फोन एलजीनं बनवला आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा मुख्य सेंसर आणि ८ मेगापिक्सलचा फिक्स्ड फोकस सेल्फी कॅमेरा आहे.


फोनच्या मागच्या कॅमेराचं अपार्चर एफ/१.८ आहे जे ऑप्टिकल स्टेबिलायजेशन प्रणालीचं आहे. याचबरोबर यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलायजेशनही देण्यात आलं आहे. यामुळे स्पष्ट फोटो काढायला मदत होते आणि कमी प्रकाश असलेल्या ठिकाणीही चांगले फोटो येतात.


गुगल पिक्सल 2 मध्ये ३,५२० mAhची बॅटरी आहे. फोन एकदा चार्ज केल्यावर दीड दिवसांपर्यंत ही बॅटरी चालू शकते. याचबरोबर फोनमध्ये गुगल लेंसही देण्यात आलं आहे, ज्यामुळे ठिकाणं आणि गल्ली ओळखणं सोपं होणार आहे. या फोनची किंमत ७३,००० रुपये (64GB) एवढी ठेवण्यात आली आहे.