Royal Enfield चा दिवाळी धमाका, लाँच करणार 3 जबरदस्त बाइक, जाणून घ्या फीचर्स
Royal Enfield Upcoming Bikes: रॉयल एनफील्ड गाड्यांबाबत तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असते. त्यामुळे कंपनीची कोणती येणार असं कळलं तरी बाइकप्रेमींमध्ये चर्चा सुरु होते. कंपनी लवकरच तीन बाइक लाँच करणार आहे.
Royal Enfield Upcoming Bikes: रॉयल एनफील्ड गाड्यांबाबत तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असते. त्यामुळे कंपनीची कोणती येणार असं कळलं तरी बाइकप्रेमींमध्ये चर्चा सुरु होते. कंपनी लवकरच तीन बाइक लाँच करणार आहे. यात 350 cc, 450 cc आणि 650 cc बाइक असणार आहेत. नुकत्याच झालेल्या चाचणीत चाचणी दरम्यान काही बाईक दिसल्या आहेत. कंपनी लवकरच या तीन बाइक्स भारतात लाँच करण्याची शक्यता आहे.
Royal Enfield Bullet 350: रॉयल एनफिल्डच्या बुलेट 350 ला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षात हजारो लोकांनी ही बाइक खरेदी केली आहे. या बाइकची तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. आता कंपनी ही गाडी अपडेट करणार आहे. ही बाइक जुन्या 350 सीसी इंजिनसह येत आहे. नवीन अपडेटमध्ये या बाइकला नवीन J प्लॅटफॉर्म इंजिन दिले जाणार आहे. रॉयल एनफिल्डचा रायडर मॅनिया इव्हेंट 18-20 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तेव्हाच अपडेटेड बुलेट 350 सादर केले जाण्याची शक्यता आहे.
Himalayan 450-Based Naked Bike: रॉयल एनफिल्डच्या या बाइकबाबत काही फीचर्स लीक झाले आहेत. लीक झालेल्या फोटोवरून गाडीचा जबरदस्त लूक दिसत आहे. हिमालयन 450 प्रमाणेच लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित असेल. बाइकला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि सिंगल-पीस सीट आहे. हिमालयन 450 पेक्षा कमी उंचीवर सेट केली जाईल. या बाइकची किंमत हिमालयन 450 पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
Honda ची ही बाइक पेट्रोलच नाही तर 'या' इंधनावरही धावणार, अशी होईल पैशांची बचत
Royal Enfield Super Meteor 650: सुपर Meteor 650 बाइक लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. यात फीट फॉरवर्ड पोझिशन आणि अधिक वक्र हँडलबार उपलब्ध असतील, ज्यामुळे रायडरला आरामदायी राइडिंग पोझिशन मिळते. Super Meteor 650 ही सध्या विकली जात असलेल्या Meteor 350 ची अधिक शक्तिशाली वर्जन असू शकते.