रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ABS च्या विक्रीस सुरूवात
वेगवेगळ्या फेजमध्ये गनमेटल ग्रे आणि Redditch मॉडेलमध्ये उपलब्ध केले गेले आहे.
मुंबई : रॉयल एनफिल्डने गेल्या वर्षी आपल्या लाईनअपमध्ये ABS देण्यास सुरूवात केली होती. आता त्यापुढे जात रॉयल इनफिल्डने आपल्या क्लासिक 350 च्या स्टॅंडर्ड वर्जनमधील सेफ्टी फिचर समोर आणले आहे. रॉयल इनफील्ड क्लासिक 350 ABS ची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 1.53 लाख आहे. यामध्ये चांगल्या ब्रेकसाठी ड्युअल चॅनल यूनिट देण्यात आले आहे. हे फिचर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये क्लासिक 350 सिंगल एडीशनमध्ये लॉंच करण्यात आले होते. यानंतर वेगवेगळ्या फेजमध्ये गनमेटल ग्रे आणि Redditch मॉडेलमध्ये उपलब्ध केले गेले आहे.
नवी क्लासिक 350 एबीएसही नॉन एबीएस मॉडेलच्या तुलनेत 5 हजार 800 रुपयांनी महाग असेल. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 एबीएसमध्ये कोणतेही जादा फिचर्स देण्यात आले नाहीत. या बाईकमध्ये जुने 346 सीसी, सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिनच उपलब्ध आहे. हे इंजिन 5250 Rpm वर 19.8 bhp इतकी पॉवर आणि 4000 rpm वर 28 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. या मोटरसोबत 5 स्पीड गियरबॉक्स देखील मिळतो.
क्लासिक 350 ABS च्या फ्रंटमध्ये 280 MM डिस्क आणि रियरमध्ये 240 mm डिस्क मिळतेय. तर सस्पेंशनसाठी याच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियरमध्ये ट्विन शॉर्क एब्जॉर्बर्स दिले गेले आहेत. स्टॅंडर्ड क्लासिक 350 मध्ये ABS दिल्यानंतर आता रॉयल एनफिल्ड बुलेट 350 आणि 350 ES मध्ये असे सेफ्टी फिचर्स येणे बाकी आहे.
एप्रिल 2019 पासून 125 CC पेक्षा जास्त सीसी असलेल्या गाड्यांमध्ये ABS असणे अनिवार्य आहे. डेडलाईनच्या आधी महिन्यापर्यंत बुलेट रेंजमध्ये ड्युअल चॅनल ABS दिले जाणार आहे. क्लासिक 350 ची तुलना भारतीय बाजारात जावा 42, बजाज डॉमिनर आणि UM Renegade शी केली जात आहे.