नवी दिल्ली : आपल्या दमदार आणि शानदार बाईक्ससाठी ओळखली जाणारी रॉयल एनफिल्ड कंपनी लवकरच आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन शानदार बाईक लॉन्च करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंटरसेप्टर ७५०' असे या बुलेटचे नाव असले तरी रॉयल एनफिल्डने मात्र अद्याप याबाबत अधिकृत भाष्य केलेले नाही. रॉयल एनफिल्डची ही बाईक भारतातील जास्त वेगाने धावणारी पहिली बुलेट असल्याचे सांगितले जात आहे. 


रॉयल एनफिल्ड 'इंटरसेप्टर ७५०' बुलेटमध्ये ७५०सीसीचं इंजिन असणार आहे. इंटरनेटवर या बुलेटचे काही फोटो लीक झाले आहेत. या नव्या बुलेटचा लूक रॉयल एनफिल्डच्या याआधीच्या 'कॉन्टिनेन्टल जीटी मॉडेल'सारखा आहे. रॉयल एनफिल्ड 'इंटरसेप्टर ७५०' या बुलेटची किंमत ४ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत या बुलेटची 'हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट ७५०' आणि 'डुकाटी मॉनस्टर ७९७' सोबत स्पर्धा असणार आहे.


रॉयल एनफिल्ड 'इंटरसेप्टर ७५०' बुलेटला ७५०सीसीचे ट्विन इंजिन आहे. या इंजिनमध्ये ५० अश्वशक्ती इतकी क्षमता आहे. 'इंटरसेप्टर ७५०' बुलेटला १७ इंचाचे रिम असणार आहे. बाइकच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहे. फ्रंट डिस्क ब्रेकमध्ये अॅण्टी ब्रेकिंग सिस्टीम आहे. तसेच, सिंगल सिट, स्पोर्टी हॅन्डलबार आणि कॅफे रेसर लुक आहे.