`रॉयल एनफिल्ड`ची ग्राहकांना खुशखबर...
टू व्हिलर कंपनी `रॉयल एनफिल्ड`नं आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिलीय.
नवी दिल्ली : टू व्हिलर कंपनी 'रॉयल एनफिल्ड'नं आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिलीय.
ग्राहकांची मागणी लक्षात घेता रॉयल एनफिल्डनं आपल्या क्लासिक सीरिजच्या बाईक आणखी दोन नव्या रंगात बाजारात उतरवलीय. याशिवाय क्लासिक सीरिजमध्ये पहिल्यांदाच फ्रंटसोबतच रिअर व्हीलमध्येही डिस्क ब्रेक देण्यात आलाय.
३५० सीसी इंजिन क्लासिक गनमेटल ग्रे रंगात उपलब्ध करून दिलीय. या बाईकची किंमत १.५९ लाख रुपये निर्धारित करण्यात आलीय.
तर ५०० सीसी इंजिनची क्लासिक स्टेल्थ ब्लॅक रंगात सादर करण्यात आलीय. याची किंमत २.०२ लाख रुपये आहे.
रॉयल एनफिल्ड नेहमीच आपले लोकप्रिय मॉडल्स नव्या ढंगात आणि नव्या रंगात सादर करत आलीय. कंपनीच्या क्लासिक सीरिजला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद लाभलाय.