मुंबई : हल्ली लोकांना बाईकने बाहेर फिरण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे लोक बाईक घेण्यासाठी वेडे झाले आहेत. त्यात Royal Enfield ही सर्वांच्या पसंतीची गाडी आहे. हे लवकरच आणखी एक नवीन बाईक हंटर 350 आणणार आहे. त्याचं लाँचिंग 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. कंपनीची ही सर्वात स्वस्त बाईक असल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने बाईकशी संबंधित टीझर व्हिडीओही जारी केला आहे. लॉन्च झाल्यानंतर ही बाईक थेट Yamaha FZ25, Suzuki Gixxer आणि Pulsar 250 सारख्या बाईकशी टक्कर देऊ शकते. असा दावा केला जात आहे.


चला याचे फीचर्स जाणून घेऊ या


यात गोल आकाराचे रियर व्ह्यू मिरर, टीअर ड्रॉप आकाराचे इंधन टँप आणि सिंगल-पीस सीट आहे.


रिपोर्टनुसार, ही बाईक किमान दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. एका व्हेरियंटमध्ये तिचे अलॉय व्हील असतील, तर दुसऱ्या व्हेरियंटमध्ये वायर-स्पोक व्हील असतील.


इंजिन


या बाईच्या इंजिनबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये Meteor 350 चे तेच 349.34cc सिंगल-सिलेंडर इंजिन वापरण्यात येणार आहे. हे इंजिन 19.9bhp पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.


इंजिनला पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. बाईकच्या टॉप व्हेरियंटमध्ये ट्रिपर नेव्हिगेशनचे फीचर दिले जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे.


बाइकला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि प्रीलोड-अॅडजस्टेबल रिअर स्प्रिंग्स मिळतील. ब्रेकिंगसाठी, दोन्ही चाकांना सिंगल डिस्क ब्रेक दिले जातील. ही बाईक किफायतशीर दरात आणली जाणार असल्याने कंपनी त्यात सिंगल चॅनल एबीएस देऊ शकते. याशिवाय हॅलोजन हेडलाइट्स आणि एलईडी टेललाइट्स दिले जाऊ शकतात.


किंमत काय असेल?


अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, हंटर 350 हे कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल असू शकतं. त्याची किंमत 1.30 लाख रुपये असू शकते. बाईक डीलरशिपवरही येण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत, लॉन्च झाल्यानंतरच त्याचे बुकिंग आणि वितरण सुरू होईल अशी अपेक्षा आहे.