Royal Enfield Bullet 350 : सर्वात स्वस्त बुलेटचा अपडेटेड मॉडल लवकरच लॉन्च
नवी जनरेशन बुलेट पहिल्यांदा टेस्टिंग दरम्यान भारतात पाहिली गेली. ही नवी मोटरसायकल लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.
मुंबई : रॉयल एनफील्ड (royal enfield) सध्या नवीन नवीन मॉडेल लॉन्च करत आहे. 2020 मध्ये Meteor 350 ने थंडरबर्ड रेंजची जागा घेतली होती. मागच्या वर्षी नवीन जनरेशन क्लासिक भारतीय बाजारात आली होती. आता कंपनीने Bullet 350 चा अपडेटेड मॉडल लॉन्च करण्याची तयारी केली आहे. याशिवाय कंपनीने सर्वात स्वस्त रॉयल एनफील्ड हंटरवर देखील काम करण्यास सुरुवात केली असून ती देखील नव्या अवतारात बाजारात येऊ शकते. Royal Enfield ही नवी Scram 411 देखील लॉन्च झाली आहे. जी हिमालयनवर सीरीजची नवी एडवेंचर मोटरसायकल आहे. (Royal Enfield New Generation Bullet 350)
नवी जनरेशन बुलेट पहिल्यांदा टेस्टिंग दरम्यान भारतात पाहिली गेली आहे. ही नवी मोटरसायकल लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. नव्या मॉडेलमध्ये डबल-क्रॅडल फेम आहे. ज्यावर इंजिन आहे. हे मॉडल नवीन हेडलँप आणि टेललँपसह दिसणार आहे. ही बाईक स्टायलिश दिसत आहे.
क्लासिक स्टाईलच्या या नव्या जनरेशन बुलेट 350 ला किक स्टार्ट वेरिएंटमध्येच लॉन्च केले जावू शकते. नव्या बाईकसह 349 सीसीचं सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड इंजिन दिलं जावू शकतं. जी 20.2 बीएचपी पावर आणि 27 एनएम पीक टॉर्क देते. या इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या पुढच्या भागात टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या भागात ट्विन शॉक अबजॉर्वर्स देण्यात आले आहेत. ब्रेक बद्दल बोलायचं झालं तर पुढच्या भागात डिस्क आणि मागच्या भागात ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.