मुंबई : eBikeGo ने बुधवारी भारतीय बाजारात G1 आणि G1+या दोन आवृत्त्यांमध्ये  Rugged  इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. ज्याची किंमत 79 हजार 999 रुपये आहे. G1+ ची किंमत 89 हजार 999 रुपये आहे आणि दोन्ही किंमतीत FAME II सब्सिडीचा समावेश आहे. मात्र, राज्यस्तरीय अनुदानाच्या अंमलबजावणीनंतर याच्या किंमती आणखी खाली येतील. देशातील वेगाने वाढत असलेल्या इलेक्ट्रिक बाजारात आणखी एक इ-स्कूटर , ही स्कूटर त्याच्या कामगिरी आणि श्रेणीमुळे चमत्कार करू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Rugged इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये  2 kWh बॅटरी आहेत. ज्या बदलण्यायोग्य आहेत. eBikeGo ने दावा केला आहे की बॅटरी 3.5 तासात चार्ज होऊ शकते आणि त्याची रेंज सुमारे 160 किलोमीटर आहे. 3kW मोटर देखील आहे जी इलेक्ट्रिक स्कूटरला 70 किमी प्रतितास वेगाने धावण्यास मदत करते.


EBikeGo चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इरफान खान म्हणाले, “कठोर अभ्यास आणि तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतातील सर्वात टिकाऊ, इंटेलिजेंट आणि मजबूत इलेक्ट्रिक मोटो-स्कूटर लाँचची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.


Rugged इलेक्ट्रिक स्कूटरची स्टोरेज क्षमता 30 लिटर आहे आणि ते एंटी-थेफ्ट फीचरचा दावा देखील करतात. याशिवाय ई-स्कूटर चालवण्यासाठी  Rugged अॅपचा वापर केला जातो. या स्कूटरमध्ये 12 सेन्सर देखील आहेत. 4G, BLE, CAN बस, GPS/IRNSS, 42 इनपुट/आउटपुट, सीरियल पोर्ट आणि एक सर्वसमावेशक मॉड्यूलर सेन्सर आहे, ही जगातील सर्वात प्रगत 2W IoT प्रणाली आहे, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


भारतात डिझाइन आणि उत्पादित, ebikeGo असा दावा करते की, Rugged इलेक्ट्रिक स्कूटर त्याच्या नावाप्रमाणेच, देशातील आव्हानात्मक रस्त्यांच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.


कंपनी आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी बाईक्सच्या चेसिसवर सात वर्षांची वॉरंटी देखील देत आहे. ईव्ही बाईक कोयंबटूरमध्ये तयार केली जाईल. कंपनीच्या वेबसाइटवर Rugged इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग 499 रुपयांच्या परताव्याच्या रकमेसाठी खुले आहे. लवकरच 1 लाख वाहनांची उत्पादन क्षमता गाठण्याची कंपनीला अपेक्षा आहे.