RV 400 Electric Bike: पेट्रोलचे वाढत्या दरांमुळे दुचाकी चालकही आता इलेक्ट्रॉनिक बाईक्सचा (Electric Bike) विचार करु लागले आहेत. अर्थात इलेक्ट्रीक बाईकमध्ये काही ना काही गोष्टी कॉम्प्रमाइज कराव्या लागतात असं सध्या तरी अशा बाईक्स घेणाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र नुकतीच बाजारात दाखल झालेली एक गाडी पाहून कॉम्प्रमाइज करण्याची गरज नाही असं तुम्हाला नक्कीच वाटू शकतं. रिवॉल्ट मोटर्सने (Revolt motors) ही बाईक बाजारात आणली आहे. ही बाईक पॉवर आणि नॉर्मल मोटरसायकलचा फील देण्यात स्वस्तात मस्त पर्याय आहे.  रिवॉल्ट मोटर्सने नव्या आरव्ही 400 ची बुकींग सुरु केली आहे. ही बाईक केवळ 2499 रुपयांमध्ये बूक करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकलची डिलेव्हरी 31 मार्चपासून सुरु होणार आहे. बुकींग करण्यासाठी रिवॉल्ट मोटर्सच्या वेबसाईटवरुन लॉगइन करावं लागणार आहे. पहिल्या अडीच हजारांची रक्कम ऑनलाइन माध्यमातूनच भरावी लागणार आहे. रिवॉल्ट मोटर्सची देशातील 22 राज्यांमध्ये 35 ठिकाणी डिलरशिप आहे.


भन्नाट टॉप स्पीड


आरव्ही 400 मध्ये 3 किलोव्हॅटची मोटर आहे. या मोटरला 72 व्हॅटच्या 3.24 किलोव्हॅट लिथियम आर्यन बॅटरीचा सपोर्ट आहे. मोटरसायकलची टॉप स्पीड 85 किमी प्रती तास इतकी आहे. तसेच मोटरसायकलमध्ये माय रिवॉल्ट कनेक्टिव्हिटी अॅप आहे. यामध्ये जियोफेसिंग, कस्टमाइज्ड साऊंड, बाइक डायग्नोस्टिक, बॅटरी स्टेटस, राइड डेटा यासारखे फिचर्स आहेत.


किंमत किती?


रिवॉल्ट आरव्हीच्या रेंजबद्दल बोलायचं झाल्यास तर सामान्य इलेक्ट्रिक टू व्हीलरपेक्षा ही बाईक नक्कीच उजवी आहे. आरव्ही 400 सिंगल चार्जमध्ये जवळजवळ 150 किमीपर्यंत धावते. मोटरसायकलमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन रायडींग मोड्स आहेत. तसेच यामध्ये अपसाइड जाउन फ्रंट फॉकर्स आणि रेअरमध्ये अॅडजेस्टेबल मोनोशॉक देण्यात आलेत. मोटरसायकलची किंमत 1.25 लाख रुपये इतकी आहे. ही या बाईकची एक्स शोरुम प्राइज आहे.