नवी दिल्ली : सॅमसंग इंडियाने गॅलक्सी A8 प्लस हॅंडसेट भारतात लॉन्च केले आहे. याची खासियत म्हणजे यात डुअल फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा हॅंडसेट अलीकडेच व्हेतनाम येथे लॉन्च करण्यात आला. सॅमसंग गॅलक्सी A8 प्लस एक्सक्लूसिव्हली अॅमेझॉन इंडियावर मिळेल. हा हॅँडसेट इनफिनिटी डिस्प्ले डिझाईन आणि वॉटर डस्ट-रेसिस्टेंट बॉडी सहीत मिळेल.


काय आहे किंमत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सुरूवातीला याची किंमत ३२,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. तर व्हेतनाम येथे याची किंमत १३,४९०,००० व्हेतनामी डॉलर आहे. भारतातील किंमत पाहता गॅलक्सी A8 प्लस को वनप्लस 5T,नोकिया 8, गूगल पिक्सल 2 आणि LG G6 यांसारख्या हॅडसेटला आव्हान मिळेल.


गॅलक्सी  A8 प्लस मध्ये एक ६ इंच फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. इनफिनिटी डिस्प्ले पॅनलच्या सेफ्टीसाठी गॅलक्सी S8 आणि गॅलक्सी S8 प्लस प्रमाणे एक कर्व्ड ग्लास आहे. हॅडसेंडमध्ये एक ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. गॅलक्सी A8 प्लस 4 जीबी आणि 6 जीबी रॅमसोबत मिळेल.


ड्युअल फ्रंड प्रोसेसर


कंपनीने या हॅंडसेटमध्ये दोन फ्रंड कॅमेरे दिले आहेत. फोनमध्ये अपर्चर f/1.9 सोबत 16 मेगापिक्सल फिक्स्ड फोकस आणि अपर्चर f/1.8 सोबत 8 मेगापिक्सल सेंसर दिला आहे. दोन्ही सेंसरसोबत युजर सेल्फी घेऊ शकतात. त्याचबरोबर बॅकग्रॉऊंडला ब्लर इफेक्ट देखील देऊ शकतात. 


कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी


सॅमसंग गॅलक्सी A8 प्लसची 64/256 जीबी मेमरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 4G LTE,वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय यात 3500 mAh पॉवरची बॅटरी आहे. हा फोन अॅनरॉईड 7.1.1 नूगा वर काम करेल.