मुंबई : फोल्ड होणारा फोन बाजारात येतोय अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. या अफवा असल्याचेही अनेकांनी म्हटले पण याला सॅमसंगने खोट ठरवलंय. सॅमसंग लवकरच फोल्ड होणारा फोन बाजारात आणणार आहे.  पूर्णपणे फोल्ड होणाऱ्या फोनची अधिकृत घोषणा सॅमसंगतर्फे करण्यात आली आहे. सॅमसंगने आज आपल्या डेव्हलपर्स कॉन्फरन्सला सुरूवात केलीयं. टॅबलेट साईज डिवाइस दाखवून याची सुरूवात झाली. हे फोल्ड होणार डिवाइस होतं. सॅमसंगने याला Infinity Flex Display म्हटलंय. कंपनीने याबद्दल अधिक माहिती दिली नाहीयं.


'गॅलेक्सी F'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घोषणेनंतर सॅमसंगचा नवा फोल्डेबल फोन येणार हे नक्की झालंय. पुढच्या काही महिन्यात याची विक्री सुरू होईल.


सध्या तरी कंपनीतर्फे याला कोणत नाव दिलं गेलं नाहीयं. सॅमसंग याला 'गॅलेक्सी F'असं नाव देणार असल्याची चर्चा आहे.


फिचर्स 


प्रेझेंटेशनमध्ये सॅमसंगने केवळ डिस्प्ले दाखवलाय. यामध्ये 7.3 इंचाचा AMOLED पॅनल असून याला मधोमध फोल्ड करता येऊ शकत. यामुळे टॅबलेट कॅंडीबार फोनमध्ये बदलू शकतो.


याच्या आऊट कव्हरवर एक सेकंडरी 4.6 इंच AMOLED डिस्प्ले आहे. याच्या मदतीनेही फोन वापरता येऊ शकतो. Infinity Flex डिस्प्ले खूप पातळ असून याला हजारोवेळा फोल्ड केलं जाऊ शकेल असे कंपनीतर्फे सांगण्यात आलंय.


हे डिव्हाइस घेणाऱ्या ग्राहकांना टॅबलेटसोबत स्मार्टफोनही मिळणार आहे.